Wednesday, May 28, 2008

लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. लहानपणापासून डायरी लिहायचे मी, नाही म्‍हणायला. पण त्‍यातले विचार अतिशय अंदाधुंद, विस्‍कळीत असायचे. मला नक्‍की काय म्‍हणायचंय ते मी चपखल अशा शब्‍दात कधीच मांडू शकले नाही. सुरु एकीकडून केले तर शेवट दुसरीकडेच कुठेतरी व्‍हायचा. मूळ मुद्‍दा हरवूनच जायचा. आणि नंतर वाचायला घेतले की मीच हरवून जायचे त्‍यात.

मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्‍वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.

माझे विचार मी अजुनही स्‍पष्‍टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्‍वच्‍छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्‍यात आहे ह्‍याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्‍छा.

- सोनल मोडक

4 comments:

Vishnoosut ( विष्णुसूत) said...

तुमचे ब्लॉग्स वाचले... फार आवडले !

sonal m m said...

माझ्‍या ब्‍लाँग ला आवर्जुन भेट दिल्‍याबाद्‍दल धन्‍यवाद विष्‍णुसूत..

HAREKRISHNAJI said...

Yes. You are right.

Blog is the most powerful media to express ourselves.

I don't agree with you on the last point.
Why you are saying like that? Well, This post is absoulutly To The Point.

Ofcouce there is always a room for improvementThe process is continuous.

Please keep on writting such good post.

Sonal said...

डायरी मी ही लिहिते.. माझ्या सहावी सातवी पासून. मी घुमी नक्कीच नाही. उलटपक्षी मी खुप बोलते. प्रत्येकाला बोलकी व्यक्ती आवडेल असं नसतं ना! अनेकवेळा मला ignored फिल व्हायचं. मग मी डायरी लिहायला लागले. आणि या लिखाणातून लिखाणाची आवड लागली. अशात ब्लॉगवर लिहिण्याचं सातत्य राहिलं नाही. पण जसं सुचत जाईल जशी सवड मिळेल तसं लिहित जाते. पण लिहित राहिल्यानं मनतली घुसमट नक्कीच कमी होते. :)