Sunday, September 28, 2014

सज्ञान पालकत्व

एकीकडे मला ऎकवलं जातं की मुलांना वाढवतांना 'आजकालच्या' पालकांना कसं भान यायची गरज आहे. 

दुसरीकडे कोणी म्हणतं ' you need to grow up'.

All when they hardly know of the situations. 

I request, let's all take our own share of responsibilities, without being judgemental about others. Generalising anything is always unjustified..instead let's all of us try to be rational. Live n let live!! 

नुसता विचार करणं वेगळं पण अनवधानानी दुसर्यांबद्दल मतं बनवण घातकंच, नाही का मित्रांनो..

Tuesday, August 26, 2014

जिजीविषा

जिवंतपणा...असतो झाडांत, पानांत, फुलात, फुलपाखरात, सुंदर सुंदर किड्यांत...प्राणी, पक्षी, माणसं सर्व असतात जिवंत. कारण प्रत्येकाकडे असते एक धग...आत्म्याची धग. Sensitivity, आजुबाजुच्या जगाला समजून घ््यायची एक अनोखी शक्ती, respond करण्याची कला. 
पण ह्या पाषाणात कसा जिवंतपणा टाकतात हे हात. छिन्नी-हातोडा वापरुन दगडाला कसे करतात हे कलाकार जिवंत. 
हा दगड बोलू लागतो. सांगू लागतो त्याच्या जिवनाची कहाणी. जी शब्दात नाही सांगता येत पण बघणार्याच्या जाणिवांना भिडते आणि मग उलगडत जातो ह्या जीर्ण पाषाणी कलाकृतींचा जीवनपट. 

कोण होती ही माणसं, ज्यांनी जीवापाड मेहनत करुन ह्या कलाकृती निर्माण केल्या. त्या काळात कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय हे सर्व निर्माण करणं नक्कीच सोपं पड़ीं नसणार! काय विचार करुन त्यांनी कलाकृती साकारल्या. त्यांच्या मनातली प्रतिमा आणिप्रत्यजक्षात उतरलेलं शिल्पं एकच होतं का? त्यांना त्यात यश मिळालं होतं का? आपण जी कला म्हणून वाखाणतो, त्यांच्या दृष्टीनं ते अपयश तर नव्हतं ना़. अपूर्ण शिल्पं पाहून आजही माझ्या मनात हा विचार येतो. 


Thursday, July 03, 2014

मृगजळ

मृगजळ दिसतंय पण, केवळ हात पुढे करून त्याच्या दिशेनं पळता येत नाहीय... 

खोलवर, आतून तहान लागल्यावरही अशी काही सक्ती होतेय की, तापल्या वाळूवरच पडून रहावसं वाटतंय...

दुसर्यांच्या इशार्यांवर चालताना माणूस आधी स्वत:शी तडजोड करतो, मग इतरांशी आणि हळुहळू तडजोड हाच त्याचा स्वभाव बनतो. 

'तडजोड' मूलत: वाईट नसते.  

"अट एवढीच की तडजोड हे आपलं ध्येय नसावं, तर पुढच्या लढाईसाठी स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी घेतलेला वेळ असावा..."

Saturday, February 22, 2014

Friday, February 21, 2014

Spiritual..

We are not human beings going through a temporary spiritual experience.
We are spiritual beings going through a temporary human experience...

अनोळखी चेहरे

आपण विश्वासाने जगाला ओरडून सांगत बसतो की आपण कसे एखाद्या व्यक्तीला पुरते ओळखतो. अमुक एका व्यक्तीवर  आपलं जिवापाड प्रेम असतं. आपण एकत्र एका छताखाली राहत असतो, हक्कानी. आपापली स्वतंत्र आयुष्यं एकमेकांबरोबर शेअर करत असतो. आणि आपल्याला वाटायला लागतं आपण त्या व्यक्तीला चांगले ओळखतो, rather इतर कोणाहापेक्षा..अगदी त्याच्या आईपेक्षाही जास्तं ! काय हा गर्व... खरंच किती भ्रमात जगतो आपण. 

एखादी व्यक्ती कधी उठते, कधी झोपते, काय खाते-पिते, कपडे काय आवडतात, कोणती गाणी आवडतात, पुस्तक वाचते किंवा कोणते वाचते...हे आणि असले थातुर मातुर संदर्भ जाणून आपण हक्कानी म्हणतो ( rather फुशारक्या मारतो) how well I know him/her आणि अचानक कधी तो बसतो sketching करायला, शांतपणे अगदी स्वत:चा होऊन. तेव्हा त्याची ती sketching kit इतकी अनोळखी वाटते...मनात येतं ही कुठे होती आपल्या घरात इतके दिवस. आणि जर ती बया इथेच होती तर तिने माझे brush आणि pencils का सामावुन नाही घेतले आतापर्यंतं. 'शेअरींग'मधुनही 'पर्सनल' असं काही उरलंच ना..
अशी एखादी आवड जी कधी शेअर नाही करता येणार, तिचा मजा लुटायचा असेल तर स्वत:सारखा दुसरा सोबती नाही. सांगुनही समोरच्यापर्यंत ती भावना पोहचवता नाही येणार. ( मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते म्हणूनच बहुतेक) 

असाच होत जातो ओळखीचा वाटणारा चेहरा अनोळखी. घरं, शहरं, देश सगळेच चेहरा हरवून बसतात. आपली नजर सगळ्यांत ओळख शोधक बसते, शेवटी हाकी काही लागतंच असं नाही. नजरेला नजर ओळखत नाही, हवा तीच पण श्वासाला श्वासाची ऊब जाणवत नाही...एक निश्चल चित्रं जसं...

आठवणी

विस्मरणात गेल्या तर त्या आठवणी कसल्या !!
तर अशा बर्याच जुन्या आठवणी हल्ली मनात पिंगा घालत आहेत़. पण मजा अशी की नव्यानीच काही गोष्टी स्पष्टं दिसायला लागल्या आहेत़. प्रत्येकवेळेस गुलाबातल्या काट्यासारख्या बोचणार्या आठवणी आता सुगंधाची बरसात करायला लागल्या आहेत़.
काटे तर असतातच गुलाबाला, आणि ते असले की ते बोचणारसुद्धा. काटेच ते शेवटी ! पण गुलाबाचं सौंदर्य असं मोहक की त्या काट्यांची पर्वा नं करता मन सारखं तिकडेच धावतं. गुलाबाचा सुगंध सतत मनाला मोहुन घेतो. 
आपलं आपण ठरवायचं की सुगंधाची पाठ धरायची की काट्यांपासून दूर पळायचं !!!

Tuesday, February 18, 2014

आधी आणि नंतर

ज्ञानाच्या आधी आणि ज्ञानाच्या नंतर माणूस भोळाच असतो़़़़़़़़़... प्रश्नं अधल्या मधल्याचा आहे. अशी माझी गोष्टं आहे... अधली-मधली. अधे-मधे कळलेली...अर्थातच अर्धी-मुर्धी..!! 

Friday, January 17, 2014

Ab ke bichhade

Music By: मेहदी हसन
Lyrics By: अहमद फ़राज़
Performed By: मेहदी हसन

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले

ढूँढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती
ये खजाने तुझे मुमकिन है खराबों में मिले

तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनों इंसान हैं तो क्यों इतने हिजाबों में मिले

ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बहता है शराबों में तो शराबों में मिले

अब लबों में हूँ न तू है न वो माज़ी है फ़राज़
जैसे तुम/वो साये तमन्ना के सराबों में मिले