Friday, May 02, 2008

पाऊस...

उन्‍हाळा फार वाढलाय...नद्‍यांबरोबर मनातले शब्‍दही आटून गेलेत बहुतेक...
महिना उलटला साधे दोन शब्‍द नाही जुळलेत अजून...अंगाची आणि मनाचीही तलखी तलखी होतेय...
पहिल्‍या सरीची वाट पाहातेय...तो मातीचा सुगंध मनावर नक्‍कीच काहीतरी जादू करेल...
धो धो पाऊस कोसळेल. मनावरची धूळ धुतली जाईल...नवे रंग, नवे आकार, झाडांना नवे धुमार...निसर्गाचा नवा हुंकार...
ये रे लवकर, अशी परीक्षा नको पाहु !!!

तो येईल...लवकर नाही, खूप वाट पहायला लावेल आधी...काय मजा मिळते त्‍याला कळत नाही.
येईल...धो धो बरसेल...तप्‍तं मनं श्रांत होतील...
आणि मग एक अशी वेळ येईल की वाटू लागेल ह्‍याने आता थोडं थांबावं...थोडं सबूरीनं घ्‍यावं...
पण तो मागे हटणार नाही...वादळ उठवेल, सगळी उलथापालथ करुन मग नामानिराळा निघून जाईल...

मग पुन्‍हा तोच खेळ...वाट पहायचा...!!!

-सोनल मोडक

2 comments:

Atul said...

kami shabdaat un-paus ani sukh dukhkha.. faar chan vyakta zaale ahe.. sundar kavita :)

sonal m m said...

hi atul, dhanyawad :)