मनुष्य प्राणी ही समुहात वावारणारी जमात !! रक्ताची नाती निसर्ग न विचारता बहाल करतो.. आपण जसे मोठे होत जातो (वयानी बरं का) आपण आपली नवी नाती जोडत जातो. तसं पाहिलं तर जन्मभर पुरणारं कोणतंच नातं नाही... जितकी नवी नाती बनत जातात, तशीच जुनी तुटंत राहतात.. काही प्रत्यक्ष अंतरामुळे तर काही मनात पडत जाणर्या खोल खोल दरीमुळे. तरी आपल्याला माणसं जोडावीशी वाटतंच राहतात...निसर्गाचा नियमच आहे बहुतेक तो.
हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...
नाही का.. हा तर आपणा सगळ्यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्या दु:खात आपणच आपले.. स्वत:च पडायचं, स्वत:च उठायचं आणि पुन्हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्याने चालायला लागायचं.
पुन्हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्या ठेचा..
हां मात्र चेहर्यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्हणे आयुष्याचं ultimate ध्येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्तं आनंदाच्या दिशेने चालत रहायचं.
म्हणजे नक्की काय करायचं GOD only knows !
- सोनल मोडक
No comments:
Post a Comment