Monday, July 17, 2006

रोज रोज

तेच जग, नवीन आभास
तीच सकाळ, नवीन प्रकाश
तीच रात्र, नवीन अनुभव
तेच झाड, नवीन बहर
तीच माणसं, नवीन संभाषण
तेच मन, नवीन आठवण
तोच देह, नवीन श्‍वास
तीच नाती, नवीन रंग
तोच रंग, नवीन संग
तोच रस्‍ता, नवी दिशा

दिवसाच्‍या शेवटी, वेगळीच मी !

-sonal m m