आता मी ठरवलंय
तिला बहरु द्यायचं
तिलाही हळुवार ऊमलू द्यायचं
तिच्याबरोबर आपणही फुलत जायचं
कितीदा मारलंय मी तिला आजवर
कधी कोणासाठी, तर कधी दबून
मनातल्या मनात तिचा
मी किती केलाय कोंडमारा
पण प्रत्येक वेळी तिचाच का द्यायचा बळी
दुसर्यांचा विचार करतांना स्वत:चा विचार कधी करायचा !!
म्हणून मी ठरवलंय...
1 comment:
आपल्याला हवे ते करण्यासारखे सुख नाही. प्रत्येकाने स्वःत साठी वेळ हा काढायलाच हवा
Post a Comment