Thursday, October 20, 2011

कोटी - कोटी

चाल - (गाण्‍याची एक, पायांची दुसरी आणि बुद्‍धीबळातली तिसरी)

मावा - (पानात घालतो तो एक आणि खवा)

हवा - (श्‍वासासाठी लागते ती आणि पाहिजे ह्‍या अर्थी)

चाट - (एक चाट पडणे आणि दुसरे चाट खाणे)

पाट - (पावसाळ्‍यात वाहणारे पाण्‍याचे पाट आणि बसायचा दुसरा)

हलवा - ( संक्रांतीचा आणि क्रियापद)

पाव - (चतकोर ह्‍या अर्थी आणि पारश्‍यांचा)

हात दाखवणे (याचे पुन्हा दोन अर्थ आहेत. नुसता दाखवतात तो एक आणि ज्योतिषाला दाखवतात तो दुसरा)

हात मारणे (याचेही दोन अर्थ - ताव मारणे आणि हाथ की सफ़ाई)

कर - नाम आणि क्रियापद

बोट - इंग्रजीतून मराठी घेतलेली होडी आणि मराठीतही नुसतंच बोट, बोट दाखवणे, बोटं मोडणे

टोप (पातेलं ह्या अर्थी) - टोप (जिरे-टोप)

टीप (सूचना)- टीप (स्‍वर टीपेचा मधली) - टीप (सुई दोर्‍याची)