मैत्रास पाहून म्हंटले लिहावे,
जुळवून अक्षरे अन् यमके वगैरे..
मनाची मनाला आता ओढ नसते,
शब्दापरी शब्द, निरर्थक वगैरे..
मैत्रास पाहून म्हंटले लिहावे,
जुळवून अक्षरे अन् यमके वगैरे..
मनाची मनाला आता ओढ नसते,
शब्दापरी शब्द, निरर्थक वगैरे..
एकीकडे मला ऎकवलं जातं की मुलांना वाढवतांना 'आजकालच्या' पालकांना कसं भान यायची गरज आहे.
दुसरीकडे कोणी म्हणतं ' you need to grow up'.
All when they hardly know of the situations.
I request, let's all take our own share of responsibilities, without being judgemental about others. Generalising anything is always unjustified..instead let's all of us try to be rational. Live n let live!!
नुसता विचार करणं वेगळं पण अनवधानानी दुसर्यांबद्दल मतं बनवण घातकंच, नाही का मित्रांनो..
मृगजळ दिसतंय पण, केवळ हात पुढे करून त्याच्या दिशेनं पळता येत नाहीय...
खोलवर, आतून तहान लागल्यावरही अशी काही सक्ती होतेय की, तापल्या वाळूवरच पडून रहावसं वाटतंय...
दुसर्यांच्या इशार्यांवर चालताना माणूस आधी स्वत:शी तडजोड करतो, मग इतरांशी आणि हळुहळू तडजोड हाच त्याचा स्वभाव बनतो.
'तडजोड' मूलत: वाईट नसते.
"अट एवढीच की तडजोड हे आपलं ध्येय नसावं, तर पुढच्या लढाईसाठी स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी घेतलेला वेळ असावा..."