Tuesday, May 13, 2008

ती,
त्‍याच्‍यात आपलं सर्व अस्‍तित्‍वं हरवून बसलेली..
ऊन्‍हाळ्‍यात कोणासाठी तरी पूर्ण आटून जाणारी..
आपल्‍या देहातले दगड धोंडे माणसाच्‍या घरासाठी देउन टाकणारी..
दोन्‍ही तट सुपीक करत दुथडी भरुन वाहत राहणारी..
अनिश्‍चित क्षय होत होत वाढत राहणारी..
नदी..जणू गरती बाई...

तो,
याचं हे असं पूर्ण ओलं असूनही कोरडं राहणं..
लाटांच्‍या एक एक करुन अनेक हातांनी कवेत घेणं..
हवहवसं वाटतं त्‍याच्‍या सर्वस्‍वी स्‍वाधीन होणं..
अनुभवलं असेल भलेही त्‍याने अशा अनेक जणींना..
तरीही तो अतृप्‍तं, अभोगी, अथांग...योगी !!!

- सोनल मोडक

No comments: