एक होता हरी. हरी कुंभार. कुंभार कसला ८- ९ वर्षाचा लहानसा मुलगाच तो.
कुंभारपण वडलांकडून वारशाने मिळालेलं, तेव्हड्यापुरतंच. बाकी मातीत खेळायला कोणाला नाही आवडणार !
तसा खेळताखेळताच तोही मातीची भांडी बनवायला शिकला आणि वडलांना कामात मदत करू लागला.
मातीत हात माखायला लागले, हळू हळू कपडेही मातीतंच रंगायला लागले. हरी कुंभार, पुरा मातीमय झाला..
भांडी बनवायला माती उपसून उपसून जमिनीत तर खड्डा बनतंच होता, पण पोटाचा खड्डा भरायला काही त्याचा उपयोग होत नव्हता. पोटाचा खड्डा वाढतंच होता.
मातीमाय त्याचं आयुष्यं असं पुरतं घेरुन बसली.
आणि एक दिवस असा आला कि तोही त्या मातीचाच झाला. पोटाचा खड्डा उरलाच नाही न् जमिनीचा खड्डा हरीने भरुन काठला...
-सोनल मोडक
2 comments:
असा मधेच एकदम दुखःद सुर का बरे ?
sukha dukha ekach nanyachya don baju...kadhi kon baji marel... :)
Post a Comment