Thursday, January 29, 2015

आज छान काहीसं वाचण्यात आलं

दोन पोक्तं पानं

एक पिवळंगार, एक हिरवंधम्मक,
बाजुबाजूला. दोघांचं देठ एकत्र थेट.
एकावरल्या रेषा दुसरं वाचतंय;
स्वत:च्या रेघांतून पसरतंय
पहिल्याच्या अंगात.

दोनंच ती. इतरांतही अशी एकत्र दोन कित्येक.
वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा.
पिवळ्या ऊन्हात पोपटी पानं...
पोक्त झाड उभंच्या उभं.


- आरती प्रभू