Monday, June 09, 2008

मला काय हवंय?

पैसा : हो! निश्‍चितच त्‍याशिवाय मन:शांती मिळणं कठीण. मला कोणी टाटा-बिर्ला नाही व्‍हायचंय.
पण कधीही मनात आलं (माझ्‍या किंवा माझ्‍या जवळच्‍यांच्‍या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्‍यावर पैसे नाहीत ह्‍या कारणाने नाही म्‍हणायला लागू नये. एव्‍हडा पैसा तरी हवा.
नक्‍कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्‍वस्‍थ झोपही मिळावी.

शिस्‍त : त्‍याशिवाय माणसाची ultimate वाट लागू शकते. मी अनुभवते आहे ती स्‍थिती सध्‍या ! moody असणं ठीक आहे. त्‍यात काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत. पण आयुष्‍‍यात शिस्‍तं असणं फार आवश्‍यक.
ज्‍यामुळे day-to-day duties करता करताच फे-फे नाही होणार. energy loss नको त्‍या गोष्‍टीत आणि त्‍याच त्‍याच गोष्‍टींत नाही होणार. नवनवीन गोष्‍टी करायचा उत्‍साह शाबूत राहील. जिवंतपणा टिकून राहण्‍यासाठी नाविन्‍य अत्‍यावश्‍यक.
शिस्‍तीबरोबर स्‍वस्‍थ आणि निरोगी मन आणि शरीर आपसूकच येणार.

मन:स्‍वास्‍थ्‍य / समाधान / peace of mind : overall 100 पैकी जास्‍तीत जास्‍त कामं यशस्‍वी व्‍हायला लागली की छोटी छोटी अपयशं ( failures) मनावर तितकासा नकारात्‍मक परिणाम नाही करणार. त्‍यांना शांतपणे तोंड द्‍यायची शक्‍ती पण सहज मिळेल. भिजत घोंगडी न राहता यशस्‍वीपणे संकटातून बाहेर पडायचे मार्ग सूचत राहतील.

संकटं किंवा दु:ख नकोत असं मी कधीच नाही म्‍हणणार. पण त्‍यांना तोंड द्‍यायला, त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी विचार करायला शांतचित्त फार आवश्‍यक. मनासारखी माणसं भोवती असणं किंवा भोवती असलेल्‍या माणसांना आहेत तसं स्‍वीकारणं ह्‍यातूनच सर्व सोपं होणार. मात्र टाळी वाजणयासाठी दोन हात हवेत. नाहीतर दुसर्‍याला जोरदार फटकाच बसायचा.

चारचाकी वाहनाचं wheel balancing काही उगीचंच नाही करत. तोच नियम माणसालाही लागू पडतो.

कुठचंही नातं, अगदी कुठचंही नातं (आई-मुल, नवरा-बायको, भावंडं अगदी नोकर-मालक सुद्‍धा) नातं यशस्‍वी होण्‍यात दोन्‍ही बाजूंकडून एकसारखे प्रयत्‍नं होणं आवश्‍यक. नाहीतर त्‍यातल्‍यात्‍यात weak बाजूची फरपट आणि strong बाजूची गळचेपी होणं अनिवार्य. friction मधून झीज होते. नात्‍यातला ओलावाही नाहीसा होवू शकतो. एकदा त्‍या stage ला पोहोचल्‍यावर पुन्‍हा ओलावा निर्माण करण्‍याचे प्रयत्‍न माणसाचा कस खाऊन जातात. त्‍यासाठी वेळच्‍यावेळी मतं clear करणं आवश्‍यक.

एक बेसिक गरज : संवाद तेव्‍हाच होवू शकतो जेव्‍हा दोन व्‍यक्‍ती सम पातळीवर येतात आणि तेव्‍हाच त्‍या जे बोलतात ते एकमेकांपर्यंत पोचतं. मधल्‍यामधे हवेत विरलेल्‍या भवना आणि शब्‍द गैरसमजच वाढवतात. त्‍यामुळे स्‍पष्‍टं आणि स्‍वच्‍छं विचार आणि बरोबर शब्‍दांचा वापर फार आवश्‍यक. माणसाचे विचार दुसर्‍यापर्यंत पोहोचवण्‍यासाठी अजून तरी शब्‍द-संवाद हा एकच मार्ग वापरला जातो.
(telepathy वगैरे दूरच्‍या गोष्‍टी. मनच जिथे थार्‍यावर नसेल, तिथे स्‍वत:लाच स्‍वत:चे विचार ऐकू येणं मुश्‍कील
तर दुसर्‍यापर्यंत तुम्‍ही ते मन-to-मन काय पोहोचवणार.) असो !
त्‍यामुळे आपल्‍याला काय वाटते ते समोरच्‍याला माहित होणं अगदीच आवश्‍यक. जेव्‍हा माणसा-माणसांत भिंती उभ्‍या राहतात, भावनाच काय शब्‍दही दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत मग !

बस्‍स ! फार काही नाही, इतकंच. ह्‍या सगळ्‍या कमवायच्‍याच गोष्‍टी आहेत म्‍हणा...free में कुछ भी नही मिलता.

माझ्‍या ह्‍या काही ईच्‍छा, फार मोठ्‍या नाहीत. पण त्‍यात involved sub-sections लिहायला घेतले तर मात्र फार मोठी गोची होईल सो लिखाण इथेच थांबवून विचारांना थोडी गति देते..काय !!

8 comments:

HAREKRISHNAJI said...

Lord,

May I request you to grant all the wishes she has asked for.

Amen

sonal m m said...

its really very nice of u...!!

though the issues r not that serious but it feels deep inside !!!

SNEHAL KENDRE said...

Tu khup jast vichar kela ahes asa watata.
it take lots of patience to think all thse things and write it in proper manner

sonal m m said...

hi snehal,
मी वेगळा असा विचार नाही केला ह्‍याबद्‍दल. वेगवेगळ्‍या वळणांवर, वेगवेगळ्‍या मन:स्‍थितीत मनात आलेले विचार
फक्‍त शांतपणे बसून लिहून काढले, इतकंच. स्‍वत:ला नक्‍की काय हवंय आयुष्‍याकडून हे अगदी जसंच्‍यातसं
कोणालाही नाही सांगता येणार बहुतेक. हेही हवं न्‌ तेही हवं अशी वेळ प्रत्‍येकावर कधीनाकधी आलीच असणार.

anyways thanks for visiting my blog.

HAREKRISHNAJI said...

नविन काही ?

Deep said...

Lord,

May I request you to>>>

LOrd, the same request of mine... but in different istyyyle

Sbko jo chaahiye wo paane ki shkti de de.. :)


waw it is great kee tula hya srv goshtee hyat he klale. :)

sonal m m said...

hehe...but these r not the only things i want, these r the prime concerns :)

Omkar Bapat said...

हं ...
तुझी प्रत्येक इछा, पुर्णत्वाकडे जाणार,
तु इतक्या स्पष्टपणे आणि सहजतेने शब्दात मांडु शकलीस त्यासाठी Congratulations...