Tuesday, May 13, 2008

बलात्‍कार ही काय फक्‍तं शारीर क्रिया आहे? मला नाही वाटत तसं. जेव्‍हा एखाद्‍या मनाचा तोल ढळतो,
तेव्‍हा तिथेच पहिला बलात्‍कार झालेला असतो. मग घटते ती फक्‍तं क्रिया ! त्‍याची तर गणतीच नको. तुम्‍ही प्रामाणिक, सज्‍जन आहात म्‍हणजे नेमकं काय? जर तुमच्‍या मनात स्‍त्रिला पाहिल्‍यावर फक्‍तं वासनाच येते,
तर तुम्‍ही तसं काही प्रत्‍यक्ष केलं नाही म्‍हणून फक्‍तं प्रामाणिक ठरता का? मनात जर ती घटना घडून गेलेली असेल
तर तुमचा सभ्‍यपणा, प्रामाणिकपणा तो काय!देवानं एकट्‍या मनुष्‍यप्राण्‍याला मेंदू नावाचा एक अतिप्रगत असा अवयव बहाल केलाय. बाकी मन वगैरे
सगळं त्‍यानंतर आलेलं, त्‍याच मेंदूतून निर्माण झालेली एक संज्ञा...दाखवू शकता मला तुम्‍ही मन वेगळं काढून?
पण माणसाची आख्‍खी ओळख त्‍या मनावर बेतलेली असते. मग सगळे मनाचे खेळ म्‍हणायचे का!
आणि हो तर त्‍या मनाची शुचिता आहे कुठे हल्‍ली? मनावर तर ताबा राहिलाच नाहिये माणसाचा.
त्‍याला काय उपाय मग? प्रत्‍यक्ष कृती न करणारे भ्रष्‍टं आत्‍मे तर खुपच आहेत अवती भवती...त्‍यांचं काय करावं मग!

-सोनल मोडक

1 comment:

Hrishikesh Sir said...

awesome views ___ keep up the good work ___