लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. लहानपणापासून डायरी लिहायचे मी, नाही म्हणायला. पण त्यातले विचार अतिशय अंदाधुंद, विस्कळीत असायचे. मला नक्की काय म्हणायचंय ते मी चपखल अशा शब्दात कधीच मांडू शकले नाही. सुरु एकीकडून केले तर शेवट दुसरीकडेच कुठेतरी व्हायचा. मूळ मुद्दा हरवूनच जायचा. आणि नंतर वाचायला घेतले की मीच हरवून जायचे त्यात.
मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.
माझे विचार मी अजुनही स्पष्टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्वच्छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्यात आहे ह्याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्छा.
- सोनल मोडक
Wednesday, May 28, 2008
नाती
मनुष्य प्राणी ही समुहात वावारणारी जमात !! रक्ताची नाती निसर्ग न विचारता बहाल करतो.. आपण जसे मोठे होत जातो (वयानी बरं का) आपण आपली नवी नाती जोडत जातो. तसं पाहिलं तर जन्मभर पुरणारं कोणतंच नातं नाही... जितकी नवी नाती बनत जातात, तशीच जुनी तुटंत राहतात.. काही प्रत्यक्ष अंतरामुळे तर काही मनात पडत जाणर्या खोल खोल दरीमुळे. तरी आपल्याला माणसं जोडावीशी वाटतंच राहतात...निसर्गाचा नियमच आहे बहुतेक तो.
हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...
नाही का.. हा तर आपणा सगळ्यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्या दु:खात आपणच आपले.. स्वत:च पडायचं, स्वत:च उठायचं आणि पुन्हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्याने चालायला लागायचं.
पुन्हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्या ठेचा..
हां मात्र चेहर्यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्हणे आयुष्याचं ultimate ध्येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्तं आनंदाच्या दिशेने चालत रहायचं.
म्हणजे नक्की काय करायचं GOD only knows !

Friday, May 23, 2008
असंच..
मनातल्या भावनांचा रंग उतरतो कागदावर
सुंदर चित्र बनत जाते
मन भरुन येतं, डोळे वाहू लागतात
आणि शब्दही झिम्मा घालू लागतात
शब्दांची लड झरू लागते
आणि मनाच्या हिरवळीवर
आठवणींचे दवबिंदू जमू लागतात...
अलवार अलगद...!!
-सोनल मोडक
सुंदर चित्र बनत जाते
मन भरुन येतं, डोळे वाहू लागतात
आणि शब्दही झिम्मा घालू लागतात
शब्दांची लड झरू लागते
आणि मनाच्या हिरवळीवर
आठवणींचे दवबिंदू जमू लागतात...
अलवार अलगद...!!
-सोनल मोडक
Thursday, May 22, 2008
ईच्छा
आता मी ठरवलंय
तिला बहरु द्यायचं
तिलाही हळुवार ऊमलू द्यायचं
तिच्याबरोबर आपणही फुलत जायचं
कितीदा मारलंय मी तिला आजवर
कधी कोणासाठी, तर कधी दबून
मनातल्या मनात तिचा
मी किती केलाय कोंडमारा
पण प्रत्येक वेळी तिचाच का द्यायचा बळी
दुसर्यांचा विचार करतांना स्वत:चा विचार कधी करायचा !!
म्हणून मी ठरवलंय...

मी अगदी शांत राहीन !
सहन होतंय तोपर्यंत
मी अगदी शांत राहीन
मनात खोलवर रुतलेलं दु:ख
आत आत दाबत राहीन..
आज ना उद्या होईल ठीक सारं
असा खोटा दिलासा मनाला देत राहीन
तेच तर करत आले आहे आजपर्यंत
रोजच स्वत:ला सांभाळत राहीन..
पण कुठेतरी खरंच थांबेल ना हे सारं?
किती दिवस..?
सहन होतंय तोपर्यंतच ना..
हरकत नाही, मी अगदी शांत राहीन !
मी अगदी शांत राहीन
मनात खोलवर रुतलेलं दु:ख
आत आत दाबत राहीन..
आज ना उद्या होईल ठीक सारं
असा खोटा दिलासा मनाला देत राहीन
तेच तर करत आले आहे आजपर्यंत
रोजच स्वत:ला सांभाळत राहीन..
पण कुठेतरी खरंच थांबेल ना हे सारं?
किती दिवस..?
सहन होतंय तोपर्यंतच ना..
हरकत नाही, मी अगदी शांत राहीन !
come september...
Green day-wake me up when september ends...
Summer has come and passed
The innocent can never last
wake me up when september ends
like my fathers come to pass
seven years has gone so fast
wake me up when september ends
here comes the rain again
falling from the stars
drenched in my pain again
becoming who we are
as my memory rests
but never forgets what I lost
wake me up when september ends
summer has come and passed
the innocent can never last
wake me up when september ends
ring out the bells again
like we did when spring began
wake me up when september ends...
Summer has come and passed
The innocent can never last
wake me up when september ends
like my fathers come to pass
seven years has gone so fast
wake me up when september ends
here comes the rain again
falling from the stars
drenched in my pain again
becoming who we are
as my memory rests
but never forgets what I lost
wake me up when september ends
summer has come and passed
the innocent can never last
wake me up when september ends
ring out the bells again
like we did when spring began
wake me up when september ends...
one more chance tonight !
well I didn't mean for this to go as far as it did..
and I didn't mean to get so close and share what we did..
and I didn't mean to fall in love, but I did..
and you didn't mean to love me back, but I know you did..
.....but what I wouldn't give to have one more chance tonight, one more chance tonight !

Tuesday, May 13, 2008
बलात्कार ही काय फक्तं शारीर क्रिया आहे? मला नाही वाटत तसं. जेव्हा एखाद्या मनाचा तोल ढळतो,
तेव्हा तिथेच पहिला बलात्कार झालेला असतो. मग घटते ती फक्तं क्रिया ! त्याची तर गणतीच नको. तुम्ही प्रामाणिक, सज्जन आहात म्हणजे नेमकं काय? जर तुमच्या मनात स्त्रिला पाहिल्यावर फक्तं वासनाच येते,
तर तुम्ही तसं काही प्रत्यक्ष केलं नाही म्हणून फक्तं प्रामाणिक ठरता का? मनात जर ती घटना घडून गेलेली असेल
तर तुमचा सभ्यपणा, प्रामाणिकपणा तो काय!देवानं एकट्या मनुष्यप्राण्याला मेंदू नावाचा एक अतिप्रगत असा अवयव बहाल केलाय. बाकी मन वगैरे
सगळं त्यानंतर आलेलं, त्याच मेंदूतून निर्माण झालेली एक संज्ञा...दाखवू शकता मला तुम्ही मन वेगळं काढून?
पण माणसाची आख्खी ओळख त्या मनावर बेतलेली असते. मग सगळे मनाचे खेळ म्हणायचे का!
आणि हो तर त्या मनाची शुचिता आहे कुठे हल्ली? मनावर तर ताबा राहिलाच नाहिये माणसाचा.
त्याला काय उपाय मग? प्रत्यक्ष कृती न करणारे भ्रष्टं आत्मे तर खुपच आहेत अवती भवती...त्यांचं काय करावं मग!

ती,
त्याच्यात आपलं सर्व अस्तित्वं हरवून बसलेली..
ऊन्हाळ्यात कोणासाठी तरी पूर्ण आटून जाणारी..
आपल्या देहातले दगड धोंडे माणसाच्या घरासाठी देउन टाकणारी..
दोन्ही तट सुपीक करत दुथडी भरुन वाहत राहणारी..
अनिश्चित क्षय होत होत वाढत राहणारी..
नदी..जणू गरती बाई...
तो,
याचं हे असं पूर्ण ओलं असूनही कोरडं राहणं..
लाटांच्या एक एक करुन अनेक हातांनी कवेत घेणं..
हवहवसं वाटतं त्याच्या सर्वस्वी स्वाधीन होणं..
अनुभवलं असेल भलेही त्याने अशा अनेक जणींना..
तरीही तो अतृप्तं, अभोगी, अथांग...योगी !!!

Thursday, May 08, 2008
मातीचं ऋण
एक होता हरी. हरी कुंभार. कुंभार कसला ८- ९ वर्षाचा लहानसा मुलगाच तो.
कुंभारपण वडलांकडून वारशाने मिळालेलं, तेव्हड्यापुरतंच. बाकी मातीत खेळायला कोणाला नाही आवडणार !
तसा खेळताखेळताच तोही मातीची भांडी बनवायला शिकला आणि वडलांना कामात मदत करू लागला.
मातीत हात माखायला लागले, हळू हळू कपडेही मातीतंच रंगायला लागले. हरी कुंभार, पुरा मातीमय झाला..
भांडी बनवायला माती उपसून उपसून जमिनीत तर खड्डा बनतंच होता, पण पोटाचा खड्डा भरायला काही त्याचा उपयोग होत नव्हता. पोटाचा खड्डा वाढतंच होता.
मातीमाय त्याचं आयुष्यं असं पुरतं घेरुन बसली.
आणि एक दिवस असा आला कि तोही त्या मातीचाच झाला. पोटाचा खड्डा उरलाच नाही न् जमिनीचा खड्डा हरीने भरुन काठला...

Monday, May 05, 2008
"मला मी"
"स्वच्छ्ं मोकळा विचार" करता येणं ही दैवी शक्ती असावी बहुधा. भोवतालचं, घराघरातलं आणि मनामनातलं वास्तव स्वस्थता नाही देत. आणि अशात "स्वच्छ्ं मोकळा विचार" करता येणं ह्यासारखं सुख नाही.
अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी बाहेरून दुसरं कोणी यायची गरज नाही.
गरज आहे आपणंच आपल्याला नीट ओळखण्याची आणि त्याहुनही जास्तं, आहोत तासे स्वीकारायची.
एकटेपणावर, कुणाची तरी सोबत हा उपाय असू नाही शकत. आपली सोबत आपल्यालाच आवडायला हवी.
प्रत्येकाच्या आयुष्यात एका ठराविक वळणावर नवरा/बायको च्या रुपात एक सोबत मिळालेलीच असते.
पण माणूस म्हणून जगतांना असं काहितरी सापडायला हवं, की ज्यायोगे "मला मी" पुरेशी ठरेन.

Friday, May 02, 2008
पाऊस...
उन्हाळा फार वाढलाय...नद्यांबरोबर मनातले शब्दही आटून गेलेत बहुतेक...
महिना उलटला साधे दोन शब्द नाही जुळलेत अजून...अंगाची आणि मनाचीही तलखी तलखी होतेय...
पहिल्या सरीची वाट पाहातेय...तो मातीचा सुगंध मनावर नक्कीच काहीतरी जादू करेल...
धो धो पाऊस कोसळेल. मनावरची धूळ धुतली जाईल...नवे रंग, नवे आकार, झाडांना नवे धुमार...निसर्गाचा नवा हुंकार...
ये रे लवकर, अशी परीक्षा नको पाहु !!!
तो येईल...लवकर नाही, खूप वाट पहायला लावेल आधी...काय मजा मिळते त्याला कळत नाही.
येईल...धो धो बरसेल...तप्तं मनं श्रांत होतील...
आणि मग एक अशी वेळ येईल की वाटू लागेल ह्याने आता थोडं थांबावं...थोडं सबूरीनं घ्यावं...
पण तो मागे हटणार नाही...वादळ उठवेल, सगळी उलथापालथ करुन मग नामानिराळा निघून जाईल...
मग पुन्हा तोच खेळ...वाट पहायचा...!!!

Subscribe to:
Posts (Atom)