Monday, December 22, 2008

मुंबई मेरी जान

परवा मुंबई मेरी जान नावाचा एक सिनेमा पाहण्‍‍यात आला. जुलै २००६ च्‍या घटनेचा परीणाम वेगवेगळ्‍या स्‍‍तरातील लोकांवर कसा झाला ह्‍याचे परिणामकारक चित्रण सिनेमात केले आहे. सिनेमा थोडा documentry च्या ढंगाने गेला आहे पण तुम्हाला तो विचार करायला लावल्‍‍याशिवाय राहत नाही.

एक टीव्ही जर्नालिस्‍‍ट, एक मोठ्‍या इंटरनँशनल फर्म मधे काम करणारा सजग नागरीक, आठवड्‍याभरात रिटायर होणार असलेला पोलिस हवालदार, त्याच्‍याच हाताखाली काम करणारा त्याचा sub-ordinate, एक चहा-काँफि vendor, हातात काही काम नसणारा हिंदुत्ववादी तरुण ह्‍यांच्याभोवती कथा फिरते.

प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती एक घटना ह्‍यासर्व पात्रांमधल्या काही चांगल्या काही वाईट प्रवृत्ती समोर आणते.

निखिल अगरवाल, एका international corporate firm मधे काम करणारा concious citizen. A firm believer in save environment drive. Is totally against the use of plastic and is very much for non-pollution. so much so that commutes by public transport deliberately to reduce traffic and pollution.

११ जुलै २००६ च्‍या संध्याकाळी, लोकल ची वाट पाहत असतांना अचानक भेटलेल्या एका मित्राच्‍या सांगण्यावरुन त्‍याच्या बरोबर सेकण्ड क्‍‍लास चा डबा पकडतो. आणि काही मिनिटातच त्याच्‍या नेहमीच्या फर्स्ट क्‍‍लास च्‍या डब्‍यात बाँब ब्लास्‍‍ट होतो.

परिणाम सगळ्‍यांनाच उध्‍‍वस्‍‍त करुन टाकणारे असतात. निखिल आतून हादरलेला, त्‍‍याची देशभक्‍ती डळमळीत झालेली. system वरचा विश्‍‍वास पुर्णपणे घालवून बसतो.

सुरेश, हिंदुत्‍‍ववादी, हातात काम नसलेला तरुण. ज्याच्‍या मनात तसेही मुसलमानांविरोधी विचार असतात, तो त्यांचा अजुनच द्‍वेष करायला लागतो.

तुकाराम पाटील, पोलिस हवालदार, भोवतालचे संपूर्ण भान असलेला, हतबल, सामान्‍‍य माणूस. इतकी वर्ष पोलिसात काम करुनही, हातून एकही मोठे काम घडू शकले नाही हा सल मनात बाळगुनच आठवड्‍याभरात रिटायर होणार असतो. तिरकस विनोदांतून आपली अस्वस्‍‍थता बाहेर काढतो राहतो.

नव्याने लग्‍‍नं झालेला तुकारामचा subordinate, सुनील कदम. निराशा अशी की एक दिवस तो आत्म‍हत्‍येचा प्रयत्‍न करतो. समाजात मिळालेलं दुय्‍यम स्‍थान, हलकी वागणूक या सगळ्‍याचा खुन्‍नस म्‍हणूनच की काय, थाँमस परिस्‍थितीचा फायदा उठवतो. आसूरी आनंदात समाधान शोधतो.

रुपाली जोशी, तडफदार टीवी पत्रकार. घडलेल्‍या घटना तिला तिच्‍या तत्‍वांचीच फेरतपासणी करायला भाग पाडतात.

परेश रावलचा हवालदार फार अस्‍वस्‍थ करुन जातो. आपल्‍या संवेदना ढवळून काढणारा हा सिनेमा प्रत्‍येकाने बघावाच असा.

- सोनल मोडक

1 comment:

HAREKRISHNAJI said...

होना, जरुर पहायला हवा, आपण चित्रपट डोळ्यासमोर जो उभाकेला आहेत.