"सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला..."
अलिकडे आमच्या काँलोनीत हे शब्द न् सूर सकाळी सकाळी कानी पडतात. पंढरपूरहून आलेले (हे आपलं माझं गृहितक) हे वासुदेव इथे दारोदारी फिरतात. वासुदेवाची आठवण माझ्या लहानपणीची. सकाळच्या हव्याहव्याशा वाटणार्या थंडीत, शाळेत जाताना वासुदेवाचं नियमित दर्शन व्हायचं. पण हळूहळु हि आठवण वासुदेवाबरोबरच विरुन गेलेली.
आजकाल ह्या भटक्या समाजातील कलाकारांची भ्रमंती कमी झालेली दिसते. त्यांचे दर्शन घडायचे ते TV किंवा जुन्या मराठी सिनेमातूनच. पण पिढ्यान्पिढ्या हा वारसा जपलेली ही काही मंडळी अजुनही आहेत.
आमच्या इथल्या cosmo काँलोनीत सध्या हे कुतुहलाचा विषय बनलेले आहेत.

1 comment:
आमच्या कडॆ दर बुधवारी अजुनही वासुदेव येतो
Post a Comment