Tuesday, December 23, 2008

जीवनाचा आनंद

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा मग, मुल झालं की....मोठं घर झालं की..... अशा अनेकांच्या आशा अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठिक होईल अशी आपण मनाची समजुत घालतो. मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितच्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरुन जाईल, असं आपल्या वाटत असतं. आपण नवरा-बायको जरा नीट वागायला लागलं की....आपल्या दाराशी एक गाडी आली की...आपल्याला मनाजोगी सुट्टी मिळाली की...निवृत्त झालो की...आपलं आयुष्य कसं सुखानं भरुन जाईल, असं आपण स्वत:शीच घोकत असतो.

खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणारच आहेत. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलता आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीय , असं बराच काळ वाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ ध्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं...आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टीकोनातुन पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही..
आनंद हाच महामार्ग आहे... म्हणुन प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा सुटल्यावर... पुन्हा शाळेत जाण्यासाठी... वजन चार किलो कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी.... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणुन...शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी... नव्याको-या गाडीची वाट बघण्यासाठी...पावसासाठी... थंडीसाठी.... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी आपण थांबुन राहिलेलो असतो.

एकदाचा तो टप्पा पार पाडला की, सारं काही मनासारखं होईल अशी आपणच आपली समजुत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापुर्वी आनंदी होण्याचं ठरवा. आता जरा या पुढे दिलेल्या पश्नांची उत्तरं द्या पाहु -
१. जगातल्या पहिल्या दहा सर्वात श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहु.
२. गेल्या पाच वर्षात विश्वसंदरी किताब मिळवणा-यांची नावं आठवतायत?
३. या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४. गेल्या दोन वर्षात ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?....

हं! काहीतरीच काय विचारताय? असं वाटलं असेल ना तुम्हाला? पण असं वाटलं नसलं तरी या प्रश्नांची उत्तरं देनं तसं सोपं नाहीच, नाही का? टाळ्यांचा कडकडात हवेत विरुन जातो...पदकं आणि चषक धुळ खात पडतात..जेत्यांचाही लवकरच विसर पडतो..

आता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहु -
१. तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२. तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणा-या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३. आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणा-या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४. तुम्हाला ज्यांच्या बरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.

क्षणभर विचार करा... आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय? मी सांगतो...जगप्रसिद्ध व्यक्तिंच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये! पण हा मेल ज्यांना आवर्जुन पाठवाव असं मला वाटलं, त्या यादीत तुमचें नाव नक्कीच आहे....

आता एक गोष्ट. काही वर्षापुर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेलेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरु होण्याच्या संकेताची वाट पहात जय्यत तयारीत उभे होते. ही सारी मुलं शारीरीक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरु झाली. सा-यांनाच पळता येत होतं असं नाही भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्या काऊन तो पडला आणि रडु लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकुन अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण...
"डाउन सिन्ड्रोम"ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्याजवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि विचारलं "आता बरं वाटतंय?"
मग सा-यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावुन चालत गेले.
ते दृष्य पाहुन मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावुन गेले. उभे राहुन मानवंदना देत सा-यांनी टाळ्यांचा कडकडात केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजुनही त्या घडनेची आठवण काढतात.

का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कीतीतरी मोठी असते.

आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळेप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.

शक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडुन येईल... कदाचित इतरांचही...दुसरी मेणबत्ती लाव्ण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही... नाही का?

- ई-मेल फौरवर्ड..(Guru)

4 comments:

Innocent Warrior said...

Too Good!!!

sonal m m said...

generally me avoid karte itranchya blogs varche posts kinva forwards mazya blog var takaycha...pan even i couldnt resist but put it up here !!!
indeed the ideas here are too good to be true !!

HAREKRISHNAJI said...

सॉलीड लिहिले आहेत

Nilesh Kumbhar said...

changale lihile aahe. Jar aapanala aanandi rahanyasathi konati vel yogya asel tar ti 'hich vel, aahe. Aahe ha kshan purepur jagun ghenyat kari majja aahe.