मुंबईवर वेळोवेळी, वेगवेगळ्या तर्हांनी हल्ले झाले. हल्लीत तर भारतभर कुठे ना कुठे बाँब ब्लास्ट होतच आहेत. त्यानिमित्ताने सुरक्षा, पोलिस यंत्रणा इ. चा आढावा घेण्याचा सपाटाच लागला आहे. आपल्यापैकी प्रत्येकानेही सजग नागरिक बनून या ना त्या प्रकारे आपआपली मतं व्यक्तं केली. कोणी कोणाला दोष दिला, राजकारण्यांची धिंड काढली. वैयक्तिक पातळीवर जागं होण्याची गरज आहे हाही एक सूर ऐकायला मिळाला. प्रत्येक भारतीय अंतरंगातून ढवळून निघालाय. महिनाभरापुर्वीचे हल्ले अजूनही सगळे विसरले नाहियेत. कित्येकजण अजून ह्या धक्यातून सावरले नाहियेत. जखमा अजुन ताज्याच आहेत. तर अशा पिरस्थितीत प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणं आवश्यक आहे.
नव्या वर्षाचे वेध लागणं साहजिक आहे. पण भूतकाळातल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी आपणंच घ्यायला हवी. पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांवर तसाही भार आहेच. त्यात आपण अजून भर नको टाकूयात. आपण नवीन वर्षाचे स्वागत जरुर करुयात पण जाणार्या वर्षातील घटनांना श्रद्धांजली देत, येणार्या वर्षात आनंद आणि शांतता पसरवूया.
- सोनल मोडक
No comments:
Post a Comment