Friday, March 28, 2008

आठवण...

तुझी आठवण,
जशी वार्‍याची झुळुक
तळपत्‍‍या सूर्याखाली
सुखद शीतल सावली

तुझी आठवण,
जशी वेडी श्रावणसर
पाचूंच्‍‍या हिरव्‍‍या बनात
ओलेतं ऊन उबदार

तुझी आठवण,
वाळवंटातलं मृगजळ
आभसी मायावी
पळते क्षितिजापार

तुझी आठवण,
जसा रातराणीचा सुगंध
रात्रीच्‍या नीरव शांततेत
बेभान, मंत्रमुग्‍ध

तुझी आठवण,
जसं कुपीतलं अत्तर
कसं न्‌ केव्‍‍हा उडून जातं
पण भिनतो सुगंध नसानसात

तुझी आठवण,
दडवलेला खजिना
पडझड झाली वाड्‍याची
तरी जाईना आस

तुझी आठवण,
विष जहरी
आयुष्‍‍यं होतं बधीर
‍प्‍याला नको पुरे एकच घोट ...

- सोनल मोडक

2 comments:

मोरपीस said...

कविता फ़ार आवडली

sonal m m said...

dhanyawad... :)