Monday, March 24, 2008

आठवणी

आताशा मला हे काय होतं कळत नाही
चालावं म्‍हणता, काही केल्‍या पाऊल पुढे पडत नाही

अनंत जुन्‍या आठवणी मनाचा कोपरा सोडून
येऊन बसतात पृष्‍ठभागावर अडमुठ्‍यासारख्‍या हटून

विसरू म्‍हणता विसरत नाहीत, आठवणीच त्‍या
बंड करुन उठतात वैरीणी जणू दाही दिशा

मी मग माघार घेऊन स्‍वत:ला त्‍यांच्‍या स्‍वाधीन करते
आडवेळी मी मग अगम्‍यं स्‍वप्‍नांच्‍या अधीन होते...

- सोनल मोडक

1 comment:

HAREKRISHNAJI said...

स्मरणशक्ती हे खरच वरदान आहे का ? की विस्मरण हे ?
नको असलेल्या कटु आठवणी आयुष्य बर रेंगाळत रहातात.
ओशो म्हणतात ध्यान करतांना या आठवणी, विचार अगदी मनोसक्त मनात येवुद्या, अजींबात ते टाळण्याचा प्रयत्न करु नकात, एक क्षण असा येतो की तुम्ही त्या पासुन अलीप्त होत जाता