सर्व काही आलबेल...
मानेच्या खाली थोडसं डावीकडे
काहीतरी हुळहुळ
कसलीतरी सळसळ
बरं नाही असं नाही
पण सगळं काही बरंही नाही
काळजी मात्र करु नको
आशेला अंतर देऊ नको
बाहेर बघ समजेल तुला
दिवस उजाडला आहे
रोजच्यासारखाच स्वच्छ पुन्हा
हल्ली आकाशात तारे नाही दिसत
खिडकीत छोटी चिऊ नाही बसत
मित्र भेटतात फक्त समारंभामधे
शुभेच्छा येतात फोनमधे
इथे नाही पण दुसरीकडे कुठे
अजुनही येतात ते सारे
सगळं काही आलबेल आहे
No comments:
Post a Comment