मी काही नियमितपणे सिनेमांची परिक्षणं लिहित नाही. पण काही सिनेमे तुम्हाला मुळातुनच हलवून सोडतात. अनुराग कश्यप यांचा गुलाल असाच एक सिनेमा.
राजकारणाचं भयाण रुप आता आपल्यासाठी काही नवं नाही. आणि college politicsही काही लहानसहान बाब नाही राहिलेली आजकाल. स्त्रियाही यात कुठे मागे राहिलेल्या नाहीत. मुलींना आपण मुलगी असण्याचे फायदे कसे उठवायचे हे काही वेगळं शिकावं लागत नाही. उपजतंच हे ज्ञान देव त्यांना देतो बहुधा. खेकड्यांच्या ह्या स्पर्धेत एकदुसर्याची शिडी करुन वर चढत जाणं हेच अंतिम सत्य. मनापासुन कोणावर प्रेम कराव आणि नंतर लक्षात यावं की आपण वापरले गेलो आहोत. प्रेम मोठं की सत्ता मोठी?
साधी पण निरुत्तर करणारी कथा.
apt music, very modern still with folk touch and matured lyrics. sure its a must see movie. this movie renders the viewers speechless !!!
2 comments:
मुलगी असण्याचे फ़ायदे मुली नाहीतर काय मुलं उठवणार?! आणि मुलगा असण्याचे फ़ायदे नाही का उठवले जात?
ho jatat na purepur...pan mulanna mulga asnyache fayde uthvaychi juni savay aahe...mulincha tasa nahi !!!
Post a Comment