Tuesday, March 11, 2008

प्रश्‍नोत्तर...

प्रश्‍नं ..

झिजलेल्‍या वस्‍त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण, विरलेल्‍या नात्‍यांना,
फाटलेल्‍या आभाळाला?
भेगाळलेल्‍या जमिनीला?
कसं रे?...
- सुषमा करंदीकर

उत्तर..

फँशन आहे ठिगळांची कपड्‍याला
नवीन नाती येतील जन्‍माला
ढगांची नक्षी रचू आकाशी
भेगांतून येइ नवे रोप वरती...

- सोनल मोडक

3 comments:

sushama said...

good,mi hech sangnar hote...

HAREKRISHNAJI said...

वा किती समर्पक जबाब. ठिगळ लावलेली घोंगडॊ अंगावर घेवुन त्यातल्या मायेची उब आठवत निद्रीस्त होण्यातले सुख आही अविटच असते

sonal m m said...

:) dhanyawad !!!