आपल्या निरर्थक बडबडीलासुद्धा patiently कान देणारा
वेळप्रसंगी कान धरुन मार्गावर आणणारा
पलिकडच्या किनार्यावर आपली वाट पाहणारा
छोटासा दिवा बनून आपली सोबत करणारा
रक्ताची नाती काय क्षणात तुटतात
मनाची नाती हळूहळू जुळतात
एकदा जुळली की आयुष्यभर फुलतात
अशीही काही आपली माणसं असतात
कुणीच आपलं नसतं
मग आपण कोणासाठी असतो
वेड्या मनाचं समाधान
बाकि इथे प्रत्येकजण एकटाच असतो
पाखरं येतात दाणा टिपून उडून जातात
क्षणभराचं नातं जोडून आठवणी सोडून जातात
विस्मरणात गेल्या तर त्या आठवणी कसल्या
बिचार्या आपली संगत करत राहतात
इथून दूर जाताना
अनेक वाटा माझ्या असतील
पावलापावलवर
आठवणी मात्रं तुझ्या असतील...
- सोनल मोडक
2 comments:
मला वाटत रक्ताच नातच ह्या जगात सर्वश्रेष्ठ असत. आणि दुसर नात मनाच असत.......एकदम गूढ पण खूप हवहवस, अतिरेकी आणि वेड लावणार असत. जीवाच जिवाशी असत. आपल्या प्रेमाशी असत.
firstly thank you for visiting my blog..that too such an old post..raktacha nata varchadh ki manacha mahit nahi.
kadhikadhi raktacha nata ani manacha nata ekruphi ho0tat...tyat spardha ashi nahi...konachya vatyala kay tar konachya vatyala kay te apan nahi tharvu shakat bahutek.
Post a Comment