Saturday, February 28, 2009

IN SEARCH OF OASIS..


A shadow with me all day
No body
This is crazy, this is crazy..
Notes of a scintillating flute
No flutist
This is crazy, this is crazy..
Breathtaking verses on paper
I was sleeping
This is crazy, this is crazy..
Vermilion laden sky
Sunrise or sunset?
This is crazy, this is crazy..
Dishevelled clothes, swollen lips
You came in my dreams
I am crazy, I am crazy..
Or is this the only sanity ? ?

Thursday, February 26, 2009

सर्वेसर्वा

आज सकाळ चांगली झाली माझी. माझा उजवा हात, माझी बाई ऊगवली वेळेवर. गेले २-४ दिवस माझे जडच गेले जरा. आपलं आजारपण आलं की हमखास ह्‍यांनाही बरं वाटेनासं होतं. आणि न सांगता दांड्‍या मारणं हा तर आपला जन्‍मसिद्‍धं हक्‍कच नाही का. तर अशा ह्‍या मँडम आज उगवल्‍या आहेत. त्‍यामुळे आज आँफिसला जाता येणार तर. माझा आठवडा आज सुरु झाला खर्‍या अर्थी !!! घरुन काम होतं, नाही असं नाही. पण कसं - अमल झोपला की, बाकीची कामं वेळेत उरकली तर...आणि हुश्‍श म्‍हणे पर्यंत अमलची ऊठायची वेळ झालेली असते. मग खेळण, भरवणं, मस्‍ती. दिवस असाच संपूनही जातो. पण असं झालं की मी totally disoriented असते. त्‍यामुळे पुन्‍हा link लागायला वेळ लागतो आणि mood ही यावा लागतो.
असो...मी आता थोडं काम करते...शुभस्‍य शीघ्रम्‌ !!!

Wednesday, February 25, 2009

पैसा बोलता है...

आम्‍ही बरेच दिवसांपासून desparately स्‍टाफच्‍या शोधात आहोत. सगळीकडे recession ची बोंब असतांना आम्‍ही इथे स्‍टाफसाठी झटतोय पण कोणी मिळत नाहिय. जो उठतो तो आपला पैशात बोलतोय. अरे आधी कामाचंसुद्‍धा थोडं बोलू यात की. पैसे तर देऊच आम्‍ही. पण...तिथेच तर घोडं पेंढ खातंय ना !!!बोला आता...मान्‍यं की महागाई प्रचंड वाढली आहे, पण अहो आम्‍हीही इथेच राहतो ह्‍याच महागाईत !! आम्‍हीही कामं करतो आणि कमवतो. तुमची मेहनत आम्‍हाला फुकटात नकोच आहे. पण !!!कामाची बात नच्‍छो...किती पगार देताय बोला !!!

Yeshwant Rao - Jejuri

Are you looking for a god?
I know a good one.
His name is Yeshwant Rao
and he's one of the best.
look him up
when you are in Jejuri next.
Of course he's only a second class god
and his place is just outside the main temple.
Outside even of the outer wall.
As if he belonged
among the tradesmen and the lepers.
I've known gods
prettier faced
or straighter laced.
Gods who soak you for your gold.
Gods who soak you for your soul.
Gods who make you walk
on a bed of burning coal.
Gods who put a child inside your wife.
Or a knife inside your enemy.
Gods who tell you how to live your life,
double your money
or triple your land holdings.
Gods who can barely suppress a smile
as you crawl a mile for them.
Gods who will see you drown
if you won't buy them a new crown.
And although I'm sure they're all to be praised,
they're either too symmetrical
or too theatrical for my taste.
Yeshwant Rao,
mass of basalt,
bright as any post box,
the shape of protoplasm
or king size lava pie
thrown against the wall,
without an arm, a leg
or even a single head.
Yeshwant Rao.
He's the god you've got to meet.
If you're short of a limb,
Yeshwant Rao will lend you a hand
and get you back on your feet.
Yeshwant Rao
Does nothing spectacular.
He doesn't promise you the earth
Or book your seat on the next rocket to heaven.
But if any bones are broken,
you know he'll mend them.
He'll make you whole in your body
and hope your spirit will look after itself.
He is merely a kind of a bone-setter.
The only thing is,
as he himself has no heads, hands and feet,
he happens to understand you a little better.

- Arun Kolatkar from JEJURI

annonymous...

आपण मातीच्या मनात मिसळून तिचं व्हावं, तिनं आपल्यात मिसळून आपलं व्हावं, अन्‌ असं उमलत रहावं, हे ज्ञानच आकाशाला नाही. ती समजुत आहे पाण्याला. म्हणून माती पाण्याशी खेळते. पाण्यात भिजते. मोहरते. ऋतूमती होते. आभाळाला ती अस्पर्श आहे. तिला त्याला भेटावसं वाटलं तर पाण्यात बिंबावं लागतं. असं पाण्यात मिसळून, पाणी होऊन गेलं तरच ती अनंत अंगांनी भेटते, बिलगते, नवे सर्जनेतिहास घडविते. तुम्ही हा संबंध समजून घ्याल तर मग माती फ़क्त हरळीला आणि कुंभारालाच कळली आहे, असं मी का म्हटल याचा उलगडा होऊन जाईल.

Tuesday, February 24, 2009

to my online friends...

आज लागली ही बया हाती. वापरीन वापरीन म्‍हणत मीनलने कधी ही डायरी उघडलीच नाही आणि मीनलचा तिच्‍यावर जीव जडला म्‍हणून मी कधी तिला हात लावला नाही. आज लिहायची ऊर्मी आली आणि ही समोर हजर. As they say it,"I can resist everything but temptation..." २००९ ची पहिलीक्षरं ह्‍याच डायरीत लिहायची !!

हल्‍ली असं झालंय ना की मित्रमंडळींना भेटायलासुद्‍धा निमित्तं शोधावी लागतात. सहजच कोणाकडे टवाळक्‍या करत तासंतास बसलोय असं कधी होतच नाही. सगळेच जण busy. अगदी श्‍वास सुद्‍धा मोजून मापून घ्‍यायला लागलोय आपण. अशा वेळेस intenet through काहीही कारण नसतांना भेटलेल्‍या व्‍यक्‍ती (त्‍यांना मित्र म्‍हणावं की नाही ते ठरवलं नाहीये अजून) जास्‍त जवळच्‍या (पेक्षा easily accesible) वाटतात. प्रत्‍यक्ष अंतरामुळे त्‍यात काही फरक पडत नाही. अशा मित्रांशी बोलतांना मला जास्‍तं मोकळं वाटतं. काही लागेबांधे जुळलेले नसल्‍यामुळे असेल बहुतेक. कारण अशावेळी मुडस्‌ वगैरे फारसे मधे येत नाहीत. एकमेकांना पूर्णपणे अनभिज्ञ असल्‍यामुळे भोवतालच्‍या परिस्‍थितीचा आमच्‍यातल्‍ला गप्‍पांवर फारसा प्रभाव पडत नाही. कोणाकडून काही अपेक्षा नाहीत, त्‍यामुळे काही गमावण्‍याची भिती नाही. प्रत्‍यक्षातल्‍या सर्व नात्‍यांना समांतर असं हे नातं. जिथे मी 'मी' असते अगदी सर्वतोपरी.
तसं प्रत्‍यक्षात होत नाही. कोणाला काय वाटेल ह्‍या दडपणाखाली हल्‍ली माझे शब्‍द तोंडातल्‍या तोंडातच घोळत राहतात. गैरसमज होण्‍यापेक्षा arguments होऊ न देणंच प्रशस्‍त वाटतं. गेल्‍या काही वर्षात रागावर काबू मिळवला मी पण आजुबाजुच्‍या बर्‍याच गोष्‍टींसाठी मूक प्रेक्षक बनून राहीलेय मी. नुसतीच बघ्‍याची भूमिका घ्‍यायची सवयच लागली आणि हळूहळू शब्‍दांनीपण पळ काढला. आतल्‍या आत एक वेगळच विश्‍व तयार झालय माझं. तशी पारदर्शकता बाहेर मिळेनाशी झालीय. पण असं स्‍वत:शीच किती बोलणार. आपली मतं मांडायलासुद्‍धा कोणाचातरी कान हवा असतोच की सगळ्‍यांना.

मिळणारे नवनवीन अनुभव आपल्‍याला मोठं करत असतात. वेगवेगळ्‍या बेटांवरुन टप्‍प्‍याटप्‍प्‍यानी आपण पुढे जात राहतो. प्रत्‍येक समुहात एक वेगळा मुखवटा चढवून वेळ साजरी करायची. मग अवचित कधी जुन्‍या बेटांवरचे सवंगडी पुन्‍हा भेटतात. त्‍यांच्‍यासाठी हा मुखवटा नवा असतो. कधी सूर पुन्‍हा जुळतात, पण जुळतातच असं नाही. पण अशात हे समांतर मित्र जवळचे वाटतात. ते तर असतातच कायम एका बटणाच्‍या अंतरावर. मुखवट्‍याशिवाय, जसेच्‍या तसे. एका पिंगची खोटी !!!

- सोनल मोडक