Thursday, February 26, 2009

सर्वेसर्वा

आज सकाळ चांगली झाली माझी. माझा उजवा हात, माझी बाई ऊगवली वेळेवर. गेले २-४ दिवस माझे जडच गेले जरा. आपलं आजारपण आलं की हमखास ह्‍यांनाही बरं वाटेनासं होतं. आणि न सांगता दांड्‍या मारणं हा तर आपला जन्‍मसिद्‍धं हक्‍कच नाही का. तर अशा ह्‍या मँडम आज उगवल्‍या आहेत. त्‍यामुळे आज आँफिसला जाता येणार तर. माझा आठवडा आज सुरु झाला खर्‍या अर्थी !!! घरुन काम होतं, नाही असं नाही. पण कसं - अमल झोपला की, बाकीची कामं वेळेत उरकली तर...आणि हुश्‍श म्‍हणे पर्यंत अमलची ऊठायची वेळ झालेली असते. मग खेळण, भरवणं, मस्‍ती. दिवस असाच संपूनही जातो. पण असं झालं की मी totally disoriented असते. त्‍यामुळे पुन्‍हा link लागायला वेळ लागतो आणि mood ही यावा लागतो.
असो...मी आता थोडं काम करते...शुभस्‍य शीघ्रम्‌ !!!

1 comment:

HAREKRISHNAJI said...

nice to hear that