Friday, June 30, 2006

पावसाळा...

नदी सागरा मिळता, पुन्‍हा येइना बाहेर
कशी शहाण्‍यांची मनं, नाही नदीला माहेर?
काय सांगू बापांनो, तुम्‍ही आंधळ्‍यांचे चेले
नदी माहेरा जाते, म्‍हणून तर जग चाले
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
जरी तिला आठवतो, जन्‍म दिलेला डोंगर
डोंगराच्‍या मायेसाठी, रुप वाफेचे घेऊन
नदी उडत जाते, पंख वार्‍याचे लेऊन
पुन्‍हा होऊन लेकरु, नदी वाजविते वाळा
पान्‍हा फुटतो डोंगरा, आणि येतो पावसाळा

- ग.दि.मा.

1 comment:

msd said...

;) where is the ther poem we were reading at home...u had written chronologically