Friday, June 30, 2006

बेट...

जगाच्या नकाशावर धुंडाळूनही सापडणार नाही अशा बेटावर आपण नकळत उतरतो.
एखाद्या अलवार क्षणी. ते असतं जखमी हृदयाचं बेट.
कधी असतो आपण त्या बेटावरचे प्रवासी, तर कधी रहिवासी !!!
इथं येण्यासाठी नको कुठलीही कागदी औपचारिकता, हवी असते फक्त केव्हातरी, कुठेतरी एखाद्या अनाम क्षणी झालेली खोल पाझरती जखम. नातं त्या जखमेशीच जडतं.
रात्रीच्या कुशीत आसपासचे डोळे मिटू मिटू झाले की जखमा डोळे किलकिले करतात... वाहू लागतात !!!

-sonal m m

No comments: