जुळलेच नाहीत सूर
झाले विसंवादी गाणे
तबला आणि पेटीचे
लोकहो ऐका जीवनगाणे
पेटीची पट्टी काळी चार
अन् तबल्याचा तर मध्यम ताल
माहीत होते दोघांना
रंगणार नव्हता त्यांचा ख्याल
सूर जुळतील कधीतरी
वाट पाहिली तबल्याने
काळी चारची पट्टी काही
सोडली नाही पेटीने
तबला म्हणाला पेटीला
आता वेगवेगळे गाऊ
आळवताना एकच राग
लयीत वेगळ्या राहु..
No comments:
Post a Comment