पावसाची सर
अंतरी काहूर
प्रीतीचा पाझर
दगडाला
वठलेला वृक्ष
जणू काळपुरुष
आशेचा धुमारा
त्यालाही फुटे
काडी काडी जोडून
चिमणीचे घर
पावसात बिचारे
गेले वाहून
इवलासा जीव
कसा कळवळे
तान्ह्या पिलासाठी
घर पुन्हा नवे
निसर्गाचा बघा
भला हा नियम
प्रलयातूनही
नवे जग साकारे..
- सोनल मोडक
1 comment:
वा क्या बात है । जींदगी डुबकर उभरती है
Post a Comment