Sunday, April 25, 2021

My quarantine story

शेवटी ती वेळ आलीच. हलकासा ताप आणि विचित्र अंगदुखी ! हे दुसरं काही असूच शकत नाही हे लक्षात येताच मी स्वत:च माझी पाठवणी माझ्या खोलीत केली. यथावकाश रिपोर्ट्स ही पॉसिटीव्ह आले. दादाच माझा डॉक्टर असल्याने औषधं लगेचंच सुरू झाली होती. आणि वायरंस च्या कृपेने म्हणा किंवा ईम्युनीटी म्हणा लक्षणं अगदीच सुसह्य होती. 

घरातली दोघं मुलं सैरभैर...पहिले दोनचार दिवस परिस्थिती समजून घेण्यात गेले..मग हळूहळू कामं सुचायला लागली. तसं आमच्या घरात घरातली कामं काही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. आम्ही तिघं गरजेप्रमाणे आपआपला वाटा न सांगता उचलतो पण माझी गैरहजेरी तशी विरळाच. 

ह्या दिवसात माझा प्रवास बेडपासून खिडकी, टॉइलेट आणि फारफारतर माझी बाल्कनी इतपतंच सुरू होता. तरी बरं सकाळी कधी शेजारी चौकशी करत तर मी आपली हजर, बाल्कनीत गप्पा मारायला. दादा-भाभीकडून आठवडभराची कुमक लगेच पोचती झालीच होती. संध्याकाळचं मित्रमंडळ असायचं गप्पा मारायला गेटवर. आणि हो, खास प्रोटीन डायेटचा (चिकन, मासे, आंबोळ्या वगरै ) पुरवठा करायला. आईचा फोन नाही असा दिवस नाही. तिचा जीव तिकडे वरखाली की आपण किती दूर आणि काहीच करू शकत नाही. पण तिला काय माहित की स्वत:ची व्यवस्थित काळजी घेऊनच ती केव्हडी मोठी मदत मला करत होती. बुढ्ढा-बुढ्ढी दोघंच तिकडे एकमेकांची काळजी घेत ! मित्र-मैत्रिणींची जागा दुसऱ्या कोणी घेणं नाही. त्यांच्या फोन मुळे एकांतवास बरा सुसह्य झाला. 

ह्या काळात बरेच आत्मसंशोधन आणि साक्षात्कार झाले.

बाहेरच्या जगाची temptations आणि distractions नसतील तर मीही स्वत:ला प्रोत्साहित करून बरीच कामं शिस्तीत करू शकते. लवकरच लक्षात आलं की मी अक्षरश: काहीही न करता तासन् तास एकाजागी बसू शकते. मी चक्क जागची न हलता जगभर फिरून आले. माझे आजपर्यंतचे अविस्मरणीय प्रवास मी पुन्हा एकदा जगू शकले. माझ्या आवडत्या मंडळींनी विनासायास भेटून आले. प्लान केलेल्या पण ह्या परिस्थितीमुळे पूर्ण होऊ न शकलेल्या ट्रीप्स मी मनमुराद आनंद घेऊन पूर्ण करू शकले. 
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मी ती व्यक्ती झाले होते जी एकटीच स्वत:शीच हसू शकते. आप्त-स्वकीय न भेटताही खुशाली विचारून जातात. पक्षी येऊन गप्पा मारतात. फुलं आपल्या मनीच्या गोष्टी सांगून जातात. जिच्याशी आजूबाजूच्या वस्तू बोलायला लागतात. माझ्या गैरहजेरीतही माझी बाग भरभरून फुलत होती. महिन्याभरापूर्वी लावलेली रक्तचंदनाची बी छान रूजली होती आणि सानुकलं पोपटी रोप माझी वाट बघत होतं. 

जिजीविषा, जीवन म्हणतात ते हेच. मी मनापासून आभार मानते, की मला फारसा त्रास न देता हा व्हायरस बरंच काही देऊन गेला. पुन्हा आयुष्यात कुठलीही गोष्ट गृहित धरणं नाही! एकच आशा की आपण सर्व आलेल्या संकटातून सुखरूप बाहेर पडावे आणि कोरोना लवकरच भूतकाळात जमा व्हावा !!

सोनल मोडक
२५/०४/२०२१

24 comments:

Unknown said...

It's superb... Extremely well penned👌👌👌. Take care Dear

sami said...

Nicely penned. Good to see you spreading positivity

Chinmay said...

फारच छान लिहिला आहेस तुझा अनुभव. एकांतवासात केलेले आत्मसंशोधन आणि त्यातून झालेले साक्षात्कार फारच सुंदर टिपले आहेत. So glad to know that you have recovered and doing well now..!

Anup Deshpande said...

अप्रतिम !! हृदयस्पर्शी लेखन , खरच खूप छान आत्मसंशोधन आणि सुंदर अनुभव, काळजी घेत रहा सर्वांची

purushottam said...

हलक्यात न घेता हलकाफुलका सामना आणि सुंदर दृष्टी

sushama said...

छान.. स्वागत परत बाह्य जगात.😊.. या निमित्ताने तुझी एक अंतर्यात्रा झाली.तुलाच तुझ्यातले गुण-दोष,कमी-अधिक कळलं.. तुझ्या assetsचं मोल कळलं..असं बघ की एक खजिना,एक आनंदनिधान सापडलं.. तुझी तू, तुझ्याच सहवासात.. आनंदासाठी बाह्य गोष्टींची आवश्यकता नसतेच मुळी!!आता त्या चंदनाच्या रोपासारखी तूही नव्याने उगवल्येस.. तुझा सुगंध शोध आणि वाट सगळ्यांना..😊

स्मिता फाटक-जोशी said...

सोनल तुझं लिखाण ही अगदी तुझ्या सारखाच मोकळं, उस्फुर्त आणि टवटवीत.. कायम प्रसन्न ठेवणार. अशीच लिहीत रहा आणि positively पसरवत रहा.

sonal m m said...

Thank you so much 🙏🏻😇

sonal m m said...

am glad you liked it Samata 😇

sonal m m said...

hey Chinmay, thank you so much 😇🙏🏻

sonal m m said...

thank you Anup..hope all well at your end too..

sonal m m said...

😇 आणि तुझी कॉमेंट..धन्यवाद

sonal m m said...

😇 आई 🤗

sonal m m said...

स्मिता, हे वाचून क्षणभर का होईना चेहऱ्यावर हसू आलं हऐच खूप 😇🤗

Yogini Amol Upadhye said...

Khup chan Sonal...tuzya likhanatun Chitra dolya samor ubha rahila...kya baat hai...

sonal m m said...

Thank you Yogini 😇

Vrushali said...

खूप छान लिहीलेस सोनल. चित्रही अगदी समर्पक

Unknown said...

Sonal खुप सुंदर व्यक्त झाली आहेस तू.

Unknown said...

Very nice Sonal.Proud of you dear.

sonal m m said...

glad you like it 😇

sonal m m said...

thank you dear..😇

Unknown said...

Chan lihile aahes.. 👍 ani sukhrup aahes he khupach Chan zhale.

Unknown said...

Nilesh Pore

sonal m m said...

Thank you Nilesh..bare aahat na sagale?