प्रत्येकाच्या अंतर्मनात गोष्टी नांदत असतात. त्यातल्या काही कथन केल्या जातात आणि बऱ्याचशा ओठांवर अडून असतात. व्यक्तिगत अनुभवांना कल्पनेच्या पंखावर घेत जगभर पसरत जाणाऱ्या गोष्टी. त्यात काही अगदीच प्रार्थनेसारख्या आणि काही अशा सुद्धा की ज्यात कल्पनाविलासापेक्षा कबुलीजबाबच अधिक असतो. तशा तर गोष्टी प्रत्येकाच्याच मनात दडून असतात पण त्यातल्या काहीच बाहेर येतात..
तेमसुला आओ