Monday, August 05, 2019

मैत्र

पाहून मैत्र माझे ,जळला हि देव स्वर्गी
सारेच भक्त त्याचे परी मित्र कोणी नाही !

त्याच्याही वाढदिवशी पार्टी कुणी न मागे
माहोल मैफिलीचा त्याच्या हि स्वर्गी नाही !

ना टोळभैरवांचा गप्पाष्टकी हि अड्डा
एका कटिंग चहाचा भुरका हि तेथ नाही !

शिवी ऐकू ये न कानी नुसतीच आरती हि
पोरीहि पटविण्याचे कडवे हि त्यात नाही !

देवा तु कमनशिबी,नशिबी तुझ्या न दोस्ती
लीन सर्व ठायी तुझ्या ,दोस्तीत हे न काही !

अरे जन्म घे इथे तु, हि पृथ्वी स्वर्ग आहे
अमृत मैत्रीचे ते स्वर्गी तुझ्याच नाही !