पण ह्या पाषाणात कसा जिवंतपणा टाकतात हे हात. छिन्नी-हातोडा वापरुन दगडाला कसे करतात हे कलाकार जिवंत.
हा दगड बोलू लागतो. सांगू लागतो त्याच्या जिवनाची कहाणी. जी शब्दात नाही सांगता येत पण बघणार्याच्या जाणिवांना भिडते आणि मग उलगडत जातो ह्या जीर्ण पाषाणी कलाकृतींचा जीवनपट.
कोण होती ही माणसं, ज्यांनी जीवापाड मेहनत करुन ह्या कलाकृती निर्माण केल्या. त्या काळात कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय हे सर्व निर्माण करणं नक्कीच सोपं पड़ीं नसणार! काय विचार करुन त्यांनी कलाकृती साकारल्या. त्यांच्या मनातली प्रतिमा आणिप्रत्यजक्षात उतरलेलं शिल्पं एकच होतं का? त्यांना त्यात यश मिळालं होतं का? आपण जी कला म्हणून वाखाणतो, त्यांच्या दृष्टीनं ते अपयश तर नव्हतं ना़. अपूर्ण शिल्पं पाहून आजही माझ्या मनात हा विचार येतो.