तर अशा बर्याच जुन्या आठवणी हल्ली मनात पिंगा घालत आहेत़. पण मजा अशी की नव्यानीच काही गोष्टी स्पष्टं दिसायला लागल्या आहेत़. प्रत्येकवेळेस गुलाबातल्या काट्यासारख्या बोचणार्या आठवणी आता सुगंधाची बरसात करायला लागल्या आहेत़.
काटे तर असतातच गुलाबाला, आणि ते असले की ते बोचणारसुद्धा. काटेच ते शेवटी ! पण गुलाबाचं सौंदर्य असं मोहक की त्या काट्यांची पर्वा नं करता मन सारखं तिकडेच धावतं. गुलाबाचा सुगंध सतत मनाला मोहुन घेतो.
आपलं आपण ठरवायचं की सुगंधाची पाठ धरायची की काट्यांपासून दूर पळायचं !!!
2 comments:
कळांची वेदना विसरली जाते पण नवजन्माची अनुभूती तृप्ती आठवणीत राहते तसेच हे असावे!
Pleasure in the pain...soothing.
Post a Comment