Saturday, February 22, 2014
Friday, February 21, 2014
Spiritual..
We are not human beings going through a temporary spiritual experience.
We are spiritual beings going through a temporary human experience...
अनोळखी चेहरे
आपण विश्वासाने जगाला ओरडून सांगत बसतो की आपण कसे एखाद्या व्यक्तीला पुरते ओळखतो. अमुक एका व्यक्तीवर आपलं जिवापाड प्रेम असतं. आपण एकत्र एका छताखाली राहत असतो, हक्कानी. आपापली स्वतंत्र आयुष्यं एकमेकांबरोबर शेअर करत असतो. आणि आपल्याला वाटायला लागतं आपण त्या व्यक्तीला चांगले ओळखतो, rather इतर कोणाहापेक्षा..अगदी त्याच्या आईपेक्षाही जास्तं ! काय हा गर्व... खरंच किती भ्रमात जगतो आपण.
एखादी व्यक्ती कधी उठते, कधी झोपते, काय खाते-पिते, कपडे काय आवडतात, कोणती गाणी आवडतात, पुस्तक वाचते किंवा कोणते वाचते...हे आणि असले थातुर मातुर संदर्भ जाणून आपण हक्कानी म्हणतो ( rather फुशारक्या मारतो) how well I know him/her आणि अचानक कधी तो बसतो sketching करायला, शांतपणे अगदी स्वत:चा होऊन. तेव्हा त्याची ती sketching kit इतकी अनोळखी वाटते...मनात येतं ही कुठे होती आपल्या घरात इतके दिवस. आणि जर ती बया इथेच होती तर तिने माझे brush आणि pencils का सामावुन नाही घेतले आतापर्यंतं. 'शेअरींग'मधुनही 'पर्सनल' असं काही उरलंच ना..
अशी एखादी आवड जी कधी शेअर नाही करता येणार, तिचा मजा लुटायचा असेल तर स्वत:सारखा दुसरा सोबती नाही. सांगुनही समोरच्यापर्यंत ती भावना पोहचवता नाही येणार. ( मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते म्हणूनच बहुतेक)
असाच होत जातो ओळखीचा वाटणारा चेहरा अनोळखी. घरं, शहरं, देश सगळेच चेहरा हरवून बसतात. आपली नजर सगळ्यांत ओळख शोधक बसते, शेवटी हाकी काही लागतंच असं नाही. नजरेला नजर ओळखत नाही, हवा तीच पण श्वासाला श्वासाची ऊब जाणवत नाही...एक निश्चल चित्रं जसं...
आठवणी
विस्मरणात गेल्या तर त्या आठवणी कसल्या !!
तर अशा बर्याच जुन्या आठवणी हल्ली मनात पिंगा घालत आहेत़. पण मजा अशी की नव्यानीच काही गोष्टी स्पष्टं दिसायला लागल्या आहेत़. प्रत्येकवेळेस गुलाबातल्या काट्यासारख्या बोचणार्या आठवणी आता सुगंधाची बरसात करायला लागल्या आहेत़.
काटे तर असतातच गुलाबाला, आणि ते असले की ते बोचणारसुद्धा. काटेच ते शेवटी ! पण गुलाबाचं सौंदर्य असं मोहक की त्या काट्यांची पर्वा नं करता मन सारखं तिकडेच धावतं. गुलाबाचा सुगंध सतत मनाला मोहुन घेतो.
आपलं आपण ठरवायचं की सुगंधाची पाठ धरायची की काट्यांपासून दूर पळायचं !!!
Tuesday, February 18, 2014
आधी आणि नंतर
ज्ञानाच्या आधी आणि ज्ञानाच्या नंतर माणूस भोळाच असतो़़़़़़़़़... प्रश्नं अधल्या मधल्याचा आहे. अशी माझी गोष्टं आहे... अधली-मधली. अधे-मधे कळलेली...अर्थातच अर्धी-मुर्धी..!!
Subscribe to:
Posts (Atom)