Friday, December 20, 2013

भान

एक वेळ अशी असते कि आपण आपला सभोवताल फक्त पित असतो. प्रत्येक गोष्टीचं नाविन्य, नवलाईचं अप्रुप जमेल तसं स्वत:त भिनवून घेत असतो. वय वाढतं तसा एकेका गोष्टीचा अर्थ हळूहळु उलगडंत जातो. त्याबरोबर जाणवायला लागतात नव्या भावना .. कधी आनंददायी तर कधी मनाला कष्टं देणार्या. छोट्या छोट्या घटनांनी कधी मन उल्हसित होतं, तर कधी कोमेजून जातं...हळुहळू ह्या सगळ्याची सवय होत जाते.

आता आनंदही संयमित आणि दु:खही थोडसं शहाणं होत आलेलं असतं...डोळ्यातल्या पाण्यालाही कधी थांबायचं ते कळलेलं असतं. मग प्रवास सुरू होतो डोळस जगण्याचा. 'मी' बरोबरंच 'ते' ही शामिल झालेले असतात. माझा विचार पुढे यायच्या आधी त्या दुसर्या कुणाचा विचार मनात पहिली जागा घेतो...मोठं होण्याच्या ह्या पहिल्या खुणा. 

इथून पुढचा प्रवास महत्वाचा...मोठेपणाचं ओझं सांभाळलं नाहि गेलं तर पुन्हा माघारीचा प्रवास..'मी' पणाचा !! 
आपण आपलं ठरवायचं ठेचकाळंत पुढची वाट चालायची की 'मी' चा comfort zone आपलासा करायचा...

1 comment:

sonal m m said...

Thank you very much for your appreciation. As you must have seen I don't restrict myself to marathi, if that's ok pls let me know how do I join your group..