Wednesday, May 28, 2008
नाती
हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...
नाही का.. हा तर आपणा सगळ्यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्या दु:खात आपणच आपले.. स्वत:च पडायचं, स्वत:च उठायचं आणि पुन्हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्याने चालायला लागायचं.
पुन्हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्या ठेचा..
हां मात्र चेहर्यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्हणे आयुष्याचं ultimate ध्येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्तं आनंदाच्या दिशेने चालत रहायचं.
म्हणजे नक्की काय करायचं GOD only knows !
- सोनल मोडक
Friday, May 23, 2008
असंच..
सुंदर चित्र बनत जाते
मन भरुन येतं, डोळे वाहू लागतात
आणि शब्दही झिम्मा घालू लागतात
शब्दांची लड झरू लागते
आणि मनाच्या हिरवळीवर
आठवणींचे दवबिंदू जमू लागतात...
अलवार अलगद...!!
-सोनल मोडक
Thursday, May 22, 2008
ईच्छा
तिला बहरु द्यायचं
तिलाही हळुवार ऊमलू द्यायचं
तिच्याबरोबर आपणही फुलत जायचं
कितीदा मारलंय मी तिला आजवर
कधी कोणासाठी, तर कधी दबून
मनातल्या मनात तिचा
मी किती केलाय कोंडमारा
पण प्रत्येक वेळी तिचाच का द्यायचा बळी
दुसर्यांचा विचार करतांना स्वत:चा विचार कधी करायचा !!
म्हणून मी ठरवलंय...
मी अगदी शांत राहीन !
मी अगदी शांत राहीन
मनात खोलवर रुतलेलं दु:ख
आत आत दाबत राहीन..
आज ना उद्या होईल ठीक सारं
असा खोटा दिलासा मनाला देत राहीन
तेच तर करत आले आहे आजपर्यंत
रोजच स्वत:ला सांभाळत राहीन..
पण कुठेतरी खरंच थांबेल ना हे सारं?
किती दिवस..?
सहन होतंय तोपर्यंतच ना..
हरकत नाही, मी अगदी शांत राहीन !
come september...
Summer has come and passed
The innocent can never last
wake me up when september ends
like my fathers come to pass
seven years has gone so fast
wake me up when september ends
here comes the rain again
falling from the stars
drenched in my pain again
becoming who we are
as my memory rests
but never forgets what I lost
wake me up when september ends
summer has come and passed
the innocent can never last
wake me up when september ends
ring out the bells again
like we did when spring began
wake me up when september ends...
one more chance tonight !
and I didn't mean to get so close and share what we did..
and I didn't mean to fall in love, but I did..
and you didn't mean to love me back, but I know you did..
.....but what I wouldn't give to have one more chance tonight, one more chance tonight !
Tuesday, May 13, 2008
तेव्हा तिथेच पहिला बलात्कार झालेला असतो. मग घटते ती फक्तं क्रिया ! त्याची तर गणतीच नको. तुम्ही प्रामाणिक, सज्जन आहात म्हणजे नेमकं काय? जर तुमच्या मनात स्त्रिला पाहिल्यावर फक्तं वासनाच येते,
तर तुम्ही तसं काही प्रत्यक्ष केलं नाही म्हणून फक्तं प्रामाणिक ठरता का? मनात जर ती घटना घडून गेलेली असेल
तर तुमचा सभ्यपणा, प्रामाणिकपणा तो काय!देवानं एकट्या मनुष्यप्राण्याला मेंदू नावाचा एक अतिप्रगत असा अवयव बहाल केलाय. बाकी मन वगैरे
सगळं त्यानंतर आलेलं, त्याच मेंदूतून निर्माण झालेली एक संज्ञा...दाखवू शकता मला तुम्ही मन वेगळं काढून?
पण माणसाची आख्खी ओळख त्या मनावर बेतलेली असते. मग सगळे मनाचे खेळ म्हणायचे का!
आणि हो तर त्या मनाची शुचिता आहे कुठे हल्ली? मनावर तर ताबा राहिलाच नाहिये माणसाचा.
त्याला काय उपाय मग? प्रत्यक्ष कृती न करणारे भ्रष्टं आत्मे तर खुपच आहेत अवती भवती...त्यांचं काय करावं मग!
-सोनल मोडक
त्याच्यात आपलं सर्व अस्तित्वं हरवून बसलेली..
ऊन्हाळ्यात कोणासाठी तरी पूर्ण आटून जाणारी..
आपल्या देहातले दगड धोंडे माणसाच्या घरासाठी देउन टाकणारी..
दोन्ही तट सुपीक करत दुथडी भरुन वाहत राहणारी..
अनिश्चित क्षय होत होत वाढत राहणारी..
नदी..जणू गरती बाई...
तो,
याचं हे असं पूर्ण ओलं असूनही कोरडं राहणं..
लाटांच्या एक एक करुन अनेक हातांनी कवेत घेणं..
हवहवसं वाटतं त्याच्या सर्वस्वी स्वाधीन होणं..
अनुभवलं असेल भलेही त्याने अशा अनेक जणींना..
तरीही तो अतृप्तं, अभोगी, अथांग...योगी !!!
- सोनल मोडक
Thursday, May 08, 2008
मातीचं ऋण
कुंभारपण वडलांकडून वारशाने मिळालेलं, तेव्हड्यापुरतंच. बाकी मातीत खेळायला कोणाला नाही आवडणार !
तसा खेळताखेळताच तोही मातीची भांडी बनवायला शिकला आणि वडलांना कामात मदत करू लागला.
मातीत हात माखायला लागले, हळू हळू कपडेही मातीतंच रंगायला लागले. हरी कुंभार, पुरा मातीमय झाला..
भांडी बनवायला माती उपसून उपसून जमिनीत तर खड्डा बनतंच होता, पण पोटाचा खड्डा भरायला काही त्याचा उपयोग होत नव्हता. पोटाचा खड्डा वाढतंच होता.
मातीमाय त्याचं आयुष्यं असं पुरतं घेरुन बसली.
आणि एक दिवस असा आला कि तोही त्या मातीचाच झाला. पोटाचा खड्डा उरलाच नाही न् जमिनीचा खड्डा हरीने भरुन काठला...
-सोनल मोडक
Monday, May 05, 2008
"मला मी"
अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी बाहेरून दुसरं कोणी यायची गरज नाही.
गरज आहे आपणंच आपल्याला नीट ओळखण्याची आणि त्याहुनही जास्तं, आहोत तासे स्वीकारायची.
एकटेपणावर, कुणाची तरी सोबत हा उपाय असू नाही शकत. आपली सोबत आपल्यालाच आवडायला हवी.
प्रत्येकाच्या आयुष्यात एका ठराविक वळणावर नवरा/बायको च्या रुपात एक सोबत मिळालेलीच असते.
पण माणूस म्हणून जगतांना असं काहितरी सापडायला हवं, की ज्यायोगे "मला मी" पुरेशी ठरेन.
Friday, May 02, 2008
पाऊस...
महिना उलटला साधे दोन शब्द नाही जुळलेत अजून...अंगाची आणि मनाचीही तलखी तलखी होतेय...
पहिल्या सरीची वाट पाहातेय...तो मातीचा सुगंध मनावर नक्कीच काहीतरी जादू करेल...
धो धो पाऊस कोसळेल. मनावरची धूळ धुतली जाईल...नवे रंग, नवे आकार, झाडांना नवे धुमार...निसर्गाचा नवा हुंकार...
ये रे लवकर, अशी परीक्षा नको पाहु !!!
तो येईल...लवकर नाही, खूप वाट पहायला लावेल आधी...काय मजा मिळते त्याला कळत नाही.
येईल...धो धो बरसेल...तप्तं मनं श्रांत होतील...
आणि मग एक अशी वेळ येईल की वाटू लागेल ह्याने आता थोडं थांबावं...थोडं सबूरीनं घ्यावं...
पण तो मागे हटणार नाही...वादळ उठवेल, सगळी उलथापालथ करुन मग नामानिराळा निघून जाईल...
मग पुन्हा तोच खेळ...वाट पहायचा...!!!
-सोनल मोडक
Friday, March 28, 2008
आठवण...
जशी वार्याची झुळुक
तळपत्या सूर्याखाली
सुखद शीतल सावली
तुझी आठवण,
जशी वेडी श्रावणसर
पाचूंच्या हिरव्या बनात
ओलेतं ऊन उबदार
तुझी आठवण,
वाळवंटातलं मृगजळ
आभसी मायावी
पळते क्षितिजापार
तुझी आठवण,
जसा रातराणीचा सुगंध
रात्रीच्या नीरव शांततेत
बेभान, मंत्रमुग्ध
तुझी आठवण,
जसं कुपीतलं अत्तर
कसं न् केव्हा उडून जातं
पण भिनतो सुगंध नसानसात
तुझी आठवण,
दडवलेला खजिना
पडझड झाली वाड्याची
तरी जाईना आस
तुझी आठवण,
विष जहरी
आयुष्यं होतं बधीर
प्याला नको पुरे एकच घोट ...
- सोनल मोडक
Monday, March 24, 2008
आठवणी
चालावं म्हणता, काही केल्या पाऊल पुढे पडत नाही
अनंत जुन्या आठवणी मनाचा कोपरा सोडून
येऊन बसतात पृष्ठभागावर अडमुठ्यासारख्या हटून
विसरू म्हणता विसरत नाहीत, आठवणीच त्या
बंड करुन उठतात वैरीणी जणू दाही दिशा
मी मग माघार घेऊन स्वत:ला त्यांच्या स्वाधीन करते
आडवेळी मी मग अगम्यं स्वप्नांच्या अधीन होते...
- सोनल मोडक
Sunday, March 23, 2008
आपण सारे अभिमन्यू..
आजच्या घडीला सरत्या शतकाच्या वळणावर एकूणच सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे. आजचा अभिमन्यू त्याला अपवाद नाही. समाजात जसं एक गोंधळाचं वातावरण आहे, तसं ते अभिमन्यूच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आहे. त्याची नोकरी, त्याच्या सवयी, त्याच्या इच्छा आकांक्षा आणि भोवतालची रोजच्या संपर्कातली माणसं या सर्वात त्याची कोंडी झालेली आहे. ज्याच्याकडे मन मोकळे करता येईल, जो खरा खरा मदतीचा हात पुढे करेल, अशा एका साथीदाराच्या तो शोधात आहे.
एकलेपणा आणि नैराश्य यातून बाहेर पडून त्याला आनंदाचे क्षण वेचायचे आहेत. त्यासाठी अनिश्चिततेच्या या चक्रव्यूहातून त्याची त्यालाच सुतका करुन घ्यायची आहे. त्याच्याकडे ह्याशिवाय दुसरा पर्याय नाहीय. परस्पर विरोधी गोष्टींनी भरलेल्या स्वत:च्या व्यक्तीमत्वाची त्याला जाणीव होणं आवश्यक आहे. सगळीकडे गोंगाट, गजबजाट आहे आणि त्यातूनच त्याला सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. तमाम भौतिक गरजा पुरवणारं भोवतालचं जग, जे आत्मशक्तीचा, आत्मोन्नतीचा मार्ग दाखवू शकत नाही, अशा आजच्या जगाचाच तो एक भाग आहे. अशा ह्या गोंधळलेल्या अवस्थेत तो कधी निकरावर येत तर कधी स्वत:ला भिरकावून दिल्यासारखा जगत राहतोय। समाजाची आजची अवस्था अशीच झाली आहे। आणि अशा वेळी अभिमन्यू काय किंवा एकूणच समाज काय, नेमकं कुठल्या प्रकारचं भविष्य अपेक्षितो आहे, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. मला इथे एक गझल आठवते,
अपनी मर्जीसे कहां अपने सफर पर हम है,
रुख हवा का जिधरका है उधरके हम है॥
माझं हे मत वाचणार्या प्रत्येकाने यावर विचार करावा. मला असं वाटतं हे तर मी स्वत: जगत आलेय आजपर्यंतं. दरवेळी स्वत:ला जाणता- जाणता तपासून पाहत किंवा आसपासच्या वातावरणाशी जमवून घेत, स्वत:च्या मनाला न पटणार्या गोष्टी करतांना मी मझी स्वत:ची ओळखंच विसरुन बसते. पण ही गोष्टं तितकीच खरी की प्रत्येकालाच यात एखादातरी आशेचा किरण, एक दिशा मिळतेच. तो किरण मला मिळाला आहे...
नकारात्मक दृष्टीकोण पूर्णपणे बदलायचा प्रयत्नं करणार आहे. पण नव्याच्या शोधात जुने गमवायचा मूर्खपणा मी करणार नाहिये. तुम्हीसुद्धा लवकरच यावर विचार करा आणि वेळ हातातून जाउ देऊ नका। -
सोनल मोडक
मोहोळ
आठवणींचं काहुर माजवून जाते
मन होतं सैरभैर असं
वादळात सापडलेलं पाखरु जसं
- सोनल मोडक
Thursday, March 20, 2008
सावर
उंच तुझी भरारी
घाल पालथ्या दाही दिशा
पण ये परतोनी माघारी
देश परका न मिळेल थारा
अनोळखी सारे चेहरे
इवलेसे पण घर आपुले
तुझ्या वाटेकडे लागले डोळे...
- सोनल मोडक
Sunday, March 16, 2008
बंध
अशी सांज यावी
दुरावा स्वत:शी
तुझ्याशी तुटावा
गात्रांतून स्वच्छंदी अन्
अंतरात घुसमटलेला
पाऊस कधीतरी
बेफाम बरसावा
बंध रेशमी तुझ्यासवे
अलगद असे जुळावे
जसा फुलासवे सुगंध
जसा धुक्याचा गहिरा रंग...
- सोनल मोडक

