Sunday, March 22, 2009
Randy Pausch: Childhood Dreams Lecture
Randy's message is about following your dreams, dealing with the ones that don't come true and having fun along the way. His talk has been viewed by more than 6 million people. He's a co-author of a best-selling book and has testified before Congress about pancreatic cancer, a disease that kills 33,000 Americans each year. He says the lessons were meant as a "message in a bottle" for his kids. so making it available here as it isn't too late to listen, learn and really live.
Randy Pausch died on July 25, 2008. But in his process, he teached millions of people about living. That's what i want to share with you.
http://www.cmu.edu/homepage/multimedia/randy-pausch-lecture.shtml
Thursday, March 19, 2009
आजचा धडा :
कोणतेसे सर बर्नार्ड शाँ बरोबर म्हणून गेलेत, "when people ask for opinions, all they want is praise."
better you be updated on the same, or else be ready to face the consequenses...i just did.
Monday, March 16, 2009
गुलाल आणि होळी
Saturday, February 28, 2009
IN SEARCH OF OASIS..
A shadow with me all day
Thursday, February 26, 2009
सर्वेसर्वा
Wednesday, February 25, 2009
पैसा बोलता है...
annonymous...
Tuesday, February 24, 2009
to my online friends...
हल्ली असं झालंय ना की मित्रमंडळींना भेटायलासुद्धा निमित्तं शोधावी लागतात. सहजच कोणाकडे टवाळक्या करत तासंतास बसलोय असं कधी होतच नाही. सगळेच जण busy. अगदी श्वास सुद्धा मोजून मापून घ्यायला लागलोय आपण. अशा वेळेस intenet through काहीही कारण नसतांना भेटलेल्या व्यक्ती (त्यांना मित्र म्हणावं की नाही ते ठरवलं नाहीये अजून) जास्त जवळच्या (पेक्षा easily accesible) वाटतात. प्रत्यक्ष अंतरामुळे त्यात काही फरक पडत नाही. अशा मित्रांशी बोलतांना मला जास्तं मोकळं वाटतं. काही लागेबांधे जुळलेले नसल्यामुळे असेल बहुतेक. कारण अशावेळी मुडस् वगैरे फारसे मधे येत नाहीत. एकमेकांना पूर्णपणे अनभिज्ञ असल्यामुळे भोवतालच्या परिस्थितीचा आमच्यातल्ला गप्पांवर फारसा प्रभाव पडत नाही. कोणाकडून काही अपेक्षा नाहीत, त्यामुळे काही गमावण्याची भिती नाही. प्रत्यक्षातल्या सर्व नात्यांना समांतर असं हे नातं. जिथे मी 'मी' असते अगदी सर्वतोपरी.
- सोनल मोडक
Tuesday, December 23, 2008
जीवनाचा आनंद
असं वाटण्याची जागा मग, मुल झालं की....मोठं घर झालं की..... अशा अनेकांच्या आशा अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठिक होईल अशी आपण मनाची समजुत घालतो. मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितच्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरुन जाईल, असं आपल्या वाटत असतं. आपण नवरा-बायको जरा नीट वागायला लागलं की....आपल्या दाराशी एक गाडी आली की...आपल्याला मनाजोगी सुट्टी मिळाली की...निवृत्त झालो की...आपलं आयुष्य कसं सुखानं भरुन जाईल, असं आपण स्वत:शीच घोकत असतो.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणारच आहेत. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलता आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीय , असं बराच काळ वाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ ध्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं...आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टीकोनातुन पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही..
आनंद हाच महामार्ग आहे... म्हणुन प्रत्येक क्षण साजरा करा.
शाळा सुटल्यावर... पुन्हा शाळेत जाण्यासाठी... वजन चार किलो कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी.... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणुन...शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी... नव्याको-या गाडीची वाट बघण्यासाठी...पावसासाठी... थंडीसाठी.... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी आपण थांबुन राहिलेलो असतो.
एकदाचा तो टप्पा पार पाडला की, सारं काही मनासारखं होईल अशी आपणच आपली समजुत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापुर्वी आनंदी होण्याचं ठरवा. आता जरा या पुढे दिलेल्या पश्नांची उत्तरं द्या पाहु -
१. जगातल्या पहिल्या दहा सर्वात श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहु.
२. गेल्या पाच वर्षात विश्वसंदरी किताब मिळवणा-यांची नावं आठवतायत?
३. या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४. गेल्या दोन वर्षात ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?....
हं! काहीतरीच काय विचारताय? असं वाटलं असेल ना तुम्हाला? पण असं वाटलं नसलं तरी या प्रश्नांची उत्तरं देनं तसं सोपं नाहीच, नाही का? टाळ्यांचा कडकडात हवेत विरुन जातो...पदकं आणि चषक धुळ खात पडतात..जेत्यांचाही लवकरच विसर पडतो..
आता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहु -
१. तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२. तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणा-या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३. आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणा-या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४. तुम्हाला ज्यांच्या बरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा... आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय? मी सांगतो...जगप्रसिद्ध व्यक्तिंच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये! पण हा मेल ज्यांना आवर्जुन पाठवाव असं मला वाटलं, त्या यादीत तुमचें नाव नक्कीच आहे....
आता एक गोष्ट. काही वर्षापुर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेलेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरु होण्याच्या संकेताची वाट पहात जय्यत तयारीत उभे होते. ही सारी मुलं शारीरीक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरु झाली. सा-यांनाच पळता येत होतं असं नाही भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्या काऊन तो पडला आणि रडु लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकुन अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण...
"डाउन सिन्ड्रोम"ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्याजवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि विचारलं "आता बरं वाटतंय?"
मग सा-यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावुन चालत गेले.
ते दृष्य पाहुन मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावुन गेले. उभे राहुन मानवंदना देत सा-यांनी टाळ्यांचा कडकडात केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजुनही त्या घडनेची आठवण काढतात.
का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कीतीतरी मोठी असते.
आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळेप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडुन येईल... कदाचित इतरांचही...दुसरी मेणबत्ती लाव्ण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही... नाही का?
- ई-मेल फौरवर्ड..(Guru)
Monday, December 22, 2008
जागो !!!
- सोनल मोडक
मुंबई मेरी जान
परवा मुंबई मेरी जान नावाचा एक सिनेमा पाहण्यात आला. जुलै २००६ च्या घटनेचा परीणाम वेगवेगळ्या स्तरातील लोकांवर कसा झाला ह्याचे परिणामकारक चित्रण सिनेमात केले आहे. सिनेमा थोडा documentry च्या ढंगाने गेला आहे पण तुम्हाला तो विचार करायला लावल्याशिवाय राहत नाही.
एक टीव्ही जर्नालिस्ट, एक मोठ्या इंटरनँशनल फर्म मधे काम करणारा सजग नागरीक, आठवड्याभरात रिटायर होणार असलेला पोलिस हवालदार, त्याच्याच हाताखाली काम करणारा त्याचा sub-ordinate, एक चहा-काँफि vendor, हातात काही काम नसणारा हिंदुत्ववादी तरुण ह्यांच्याभोवती कथा फिरते.
प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती एक घटना ह्यासर्व पात्रांमधल्या काही चांगल्या काही वाईट प्रवृत्ती समोर आणते.
निखिल अगरवाल, एका international corporate firm मधे काम करणारा concious citizen. A firm believer in save environment drive. Is totally against the use of plastic and is very much for non-pollution. so much so that commutes by public transport deliberately to reduce traffic and pollution.
११ जुलै २००६ च्या संध्याकाळी, लोकल ची वाट पाहत असतांना अचानक भेटलेल्या एका मित्राच्या सांगण्यावरुन त्याच्या बरोबर सेकण्ड क्लास चा डबा पकडतो. आणि काही मिनिटातच त्याच्या नेहमीच्या फर्स्ट क्लास च्या डब्यात बाँब ब्लास्ट होतो.
परिणाम सगळ्यांनाच उध्वस्त करुन टाकणारे असतात. निखिल आतून हादरलेला, त्याची देशभक्ती डळमळीत झालेली. system वरचा विश्वास पुर्णपणे घालवून बसतो.
सुरेश, हिंदुत्ववादी, हातात काम नसलेला तरुण. ज्याच्या मनात तसेही मुसलमानांविरोधी विचार असतात, तो त्यांचा अजुनच द्वेष करायला लागतो.
तुकाराम पाटील, पोलिस हवालदार, भोवतालचे संपूर्ण भान असलेला, हतबल, सामान्य माणूस. इतकी वर्ष पोलिसात काम करुनही, हातून एकही मोठे काम घडू शकले नाही हा सल मनात बाळगुनच आठवड्याभरात रिटायर होणार असतो. तिरकस विनोदांतून आपली अस्वस्थता बाहेर काढतो राहतो.
नव्याने लग्नं झालेला तुकारामचा subordinate, सुनील कदम. निराशा अशी की एक दिवस तो आत्महत्येचा प्रयत्न करतो. समाजात मिळालेलं दुय्यम स्थान, हलकी वागणूक या सगळ्याचा खुन्नस म्हणूनच की काय, थाँमस परिस्थितीचा फायदा उठवतो. आसूरी आनंदात समाधान शोधतो.
रुपाली जोशी, तडफदार टीवी पत्रकार. घडलेल्या घटना तिला तिच्या तत्वांचीच फेरतपासणी करायला भाग पाडतात.
परेश रावलचा हवालदार फार अस्वस्थ करुन जातो. आपल्या संवेदना ढवळून काढणारा हा सिनेमा प्रत्येकाने बघावाच असा.
- सोनल मोडक
Saturday, December 20, 2008
अ ब क ड
मिळायला लागला आहे...मी म्हणते माझे शब्द हरवलेत...म्हणून आता ठरवलंय सगळं नव्यानी अमलबरोबर पुन्हा शिकायचं. नव्यानी जग पाहायचं.
वासुदेव
अलिकडे आमच्या काँलोनीत हे शब्द न् सूर सकाळी सकाळी कानी पडतात. पंढरपूरहून आलेले (हे आपलं माझं गृहितक) हे वासुदेव इथे दारोदारी फिरतात. वासुदेवाची आठवण माझ्या लहानपणीची. सकाळच्या हव्याहव्याशा वाटणार्या थंडीत, शाळेत जाताना वासुदेवाचं नियमित दर्शन व्हायचं. पण हळूहळु हि आठवण वासुदेवाबरोबरच विरुन गेलेली.
आजकाल ह्या भटक्या समाजातील कलाकारांची भ्रमंती कमी झालेली दिसते. त्यांचे दर्शन घडायचे ते TV किंवा जुन्या मराठी सिनेमातूनच. पण पिढ्यान्पिढ्या हा वारसा जपलेली ही काही मंडळी अजुनही आहेत.
आमच्या इथल्या cosmo काँलोनीत सध्या हे कुतुहलाचा विषय बनलेले आहेत.
Monday, December 08, 2008
प्रातिनिधीक
५ मिनिटं......१०मिनिटं.........१५ मिनिटं.........माहित नाही अशी किती मिनिटं मोजली.
अजुनही मी तिथेच आहे...अडकलेली. कधी सुटणार हा ट्राफीक जाम? कधी थांबणार मनाची ही घुसमट? हवाय
फक्तं एक मोकळा श्वास....छातीभरुन !!!
प्रार्थना
माणूस म्हणून मी इथवर येईन असा विचारही कधी केला नव्हता मी.
मी अतिप्रगत - पण बंदुकीच्या एका गोळीलाही माझं मला तोंड नाही देता येत. माझी शकलं-शकलं उडतात.
मी अतिप्रगत - पण मला माझ्या शत्रुचा चेहरा नाही ओळखता येत. पाठीमागून नाही तर समोरून वार करून
शत्रू मला चीत करतो.
मी अतिप्रगत - मी असा भावनाविवश की मी कोणाला मरतांना नाही पाहू शकत कारण मी कोणाला मारत नाही.
मी अतिप्रगत - स्वत:भोवती चार भिंतींचं जग उभारून मनाला खोटंच समाधान देत राहतो की मी इथे सुरक्षित
आहे. त्याबाहेर कोणालाही मदत करायची माझी तयारी नाही.
मी तत्वनिष्ठं. पण माझ्या तत्वांचं सामर्थ्य माझं मलाच ज्ञात नाही. शत्रू समोरुन माझ्या घरात शिरून माझ्या
स्वप्नांचा चक्काचूर करुन जातो. ना मी शस्त्र बाळगतो ना मी ते चालवायला शिकलोय.
स्वत:ची शिकार स्वत: करणं तर सोडाच, पण स्वत:चा बचावही मी स्वत: करु शकत नाही.
पण मनाच्या शक्तीवरचा माझा विश्वास अजून डळमळला नाहीए. प्रार्थनेचं सामर्थ्य मी जाणतो. मी प्रार्थना करु शकतो.
स्वत:च्या आणि इतर सर्व मित्रांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी !!!
Friday, June 27, 2008
निसर्गाचा नियम
अंतरी काहूर
प्रीतीचा पाझर
दगडाला
वठलेला वृक्ष
जणू काळपुरुष
आशेचा धुमारा
त्यालाही फुटे
काडी काडी जोडून
चिमणीचे घर
पावसात बिचारे
गेले वाहून
इवलासा जीव
कसा कळवळे
तान्ह्या पिलासाठी
घर पुन्हा नवे
निसर्गाचा बघा
भला हा नियम
प्रलयातूनही
नवे जग साकारे..
- सोनल मोडक
Wednesday, June 25, 2008
बुडबुडे
ठरवतं तरी कोण की कोणी मोठं व्हायचंय आणि कोणी छोटंच राहायचंय?
तुम्ही भलेही माराल हो हातपाय मोठं होण्यासाठी...पण सागळ्यांनाच यश मिळतं? कोण ठरवतं मग, की ह्याच्या प्रयत्नांना यश द्यायचं आणि ह्याला तसंच हातपाय मारत सोडून द्यायचं?
इथे "देव" हे उत्तर मला नक्कीच अपेक्षित नाही !!
पण खरं उत्तर तर मलाही माहित नाही अजून.
तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा...
-सोनल मोडक
Monday, June 09, 2008
मला काय हवंय?
पण कधीही मनात आलं (माझ्या किंवा माझ्या जवळच्यांच्या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्यावर पैसे नाहीत ह्या कारणाने नाही म्हणायला लागू नये. एव्हडा पैसा तरी हवा.
नक्कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्वस्थ झोपही मिळावी.
शिस्त : त्याशिवाय माणसाची ultimate वाट लागू शकते. मी अनुभवते आहे ती स्थिती सध्या ! moody असणं ठीक आहे. त्यात काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत. पण आयुष्यात शिस्तं असणं फार आवश्यक.
ज्यामुळे day-to-day duties करता करताच फे-फे नाही होणार. energy loss नको त्या गोष्टीत आणि त्याच त्याच गोष्टींत नाही होणार. नवनवीन गोष्टी करायचा उत्साह शाबूत राहील. जिवंतपणा टिकून राहण्यासाठी नाविन्य अत्यावश्यक.
शिस्तीबरोबर स्वस्थ आणि निरोगी मन आणि शरीर आपसूकच येणार.
मन:स्वास्थ्य / समाधान / peace of mind : overall 100 पैकी जास्तीत जास्त कामं यशस्वी व्हायला लागली की छोटी छोटी अपयशं ( failures) मनावर तितकासा नकारात्मक परिणाम नाही करणार. त्यांना शांतपणे तोंड द्यायची शक्ती पण सहज मिळेल. भिजत घोंगडी न राहता यशस्वीपणे संकटातून बाहेर पडायचे मार्ग सूचत राहतील.
संकटं किंवा दु:ख नकोत असं मी कधीच नाही म्हणणार. पण त्यांना तोंड द्यायला, त्यातून बाहेर पडण्यासाठी विचार करायला शांतचित्त फार आवश्यक. मनासारखी माणसं भोवती असणं किंवा भोवती असलेल्या माणसांना आहेत तसं स्वीकारणं ह्यातूनच सर्व सोपं होणार. मात्र टाळी वाजणयासाठी दोन हात हवेत. नाहीतर दुसर्याला जोरदार फटकाच बसायचा.
चारचाकी वाहनाचं wheel balancing काही उगीचंच नाही करत. तोच नियम माणसालाही लागू पडतो.
कुठचंही नातं, अगदी कुठचंही नातं (आई-मुल, नवरा-बायको, भावंडं अगदी नोकर-मालक सुद्धा) नातं यशस्वी होण्यात दोन्ही बाजूंकडून एकसारखे प्रयत्नं होणं आवश्यक. नाहीतर त्यातल्यात्यात weak बाजूची फरपट आणि strong बाजूची गळचेपी होणं अनिवार्य. friction मधून झीज होते. नात्यातला ओलावाही नाहीसा होवू शकतो. एकदा त्या stage ला पोहोचल्यावर पुन्हा ओलावा निर्माण करण्याचे प्रयत्न माणसाचा कस खाऊन जातात. त्यासाठी वेळच्यावेळी मतं clear करणं आवश्यक.
एक बेसिक गरज : संवाद तेव्हाच होवू शकतो जेव्हा दोन व्यक्ती सम पातळीवर येतात आणि तेव्हाच त्या जे बोलतात ते एकमेकांपर्यंत पोचतं. मधल्यामधे हवेत विरलेल्या भवना आणि शब्द गैरसमजच वाढवतात. त्यामुळे स्पष्टं आणि स्वच्छं विचार आणि बरोबर शब्दांचा वापर फार आवश्यक. माणसाचे विचार दुसर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून तरी शब्द-संवाद हा एकच मार्ग वापरला जातो.
(telepathy वगैरे दूरच्या गोष्टी. मनच जिथे थार्यावर नसेल, तिथे स्वत:लाच स्वत:चे विचार ऐकू येणं मुश्कील
तर दुसर्यापर्यंत तुम्ही ते मन-to-मन काय पोहोचवणार.) असो !
त्यामुळे आपल्याला काय वाटते ते समोरच्याला माहित होणं अगदीच आवश्यक. जेव्हा माणसा-माणसांत भिंती उभ्या राहतात, भावनाच काय शब्दही दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत मग !
बस्स ! फार काही नाही, इतकंच. ह्या सगळ्या कमवायच्याच गोष्टी आहेत म्हणा...free में कुछ भी नही मिलता.
माझ्या ह्या काही ईच्छा, फार मोठ्या नाहीत. पण त्यात involved sub-sections लिहायला घेतले तर मात्र फार मोठी गोची होईल सो लिखाण इथेच थांबवून विचारांना थोडी गति देते..काय !!
Wednesday, May 28, 2008
मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.
माझे विचार मी अजुनही स्पष्टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्वच्छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्यात आहे ह्याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्छा.
- सोनल मोडक
नाती
हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...
नाही का.. हा तर आपणा सगळ्यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्या दु:खात आपणच आपले.. स्वत:च पडायचं, स्वत:च उठायचं आणि पुन्हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्याने चालायला लागायचं.
पुन्हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्या ठेचा..
हां मात्र चेहर्यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्हणे आयुष्याचं ultimate ध्येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्तं आनंदाच्या दिशेने चालत रहायचं.
म्हणजे नक्की काय करायचं GOD only knows !
- सोनल मोडक