Showing posts with label photos. Show all posts
Showing posts with label photos. Show all posts

Saturday, April 04, 2009

Saturday, December 20, 2008

अ ब क ड

आई, बाबा, आजी, सुशा, आबा, काका, काकू, दादा, दीदी, ताई, हातू, चिऊ, काऊ, माऊ, शूज, बाप-रे, शीशी-शूशू.....अजुनही बरंच काही...ही आहे माझ्‍या अमलची शब्‍दसंपदा. आता ह्‍या सगळ्‍या शब्‍दांना हळूहळू अर्थही
मिळायला लागला आहे...मी म्‍हणते माझे शब्‍द हरवलेत...म्‍हणून आता ठरवलंय सगळं नव्‍यानी अमलबरोबर पुन्‍हा शिकायचं. नव्‍यानी जग पाहायचं.

वासुदेव

"सकाळच्‍या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला..."

अलिकडे आमच्‍या काँलोनीत हे शब्‍द न् सूर सकाळी सकाळी कानी पडतात. पंढरपूरहून आलेले (हे आपलं माझं गृहितक) हे वासुदेव इथे दारोदारी फिरतात. वासुदेवाची आठवण माझ्‍या लहानपणीची. सकाळच्‍या हव्‍याहव्‍याशा वाटणार्‍या थंडीत, शाळेत जाताना वासुदेवाचं नियमित दर्शन‍ व्‍हायचं. पण हळूहळु हि आठवण वासुदेवाबरोबरच विरुन गेलेली.

आजकाल ह्‍या भटक्‍या समाजातील कलाकारांची भ्रमंती कमी झालेली दिसते. त्‍यांचे दर्शन घडायचे ते TV किंवा जुन्‍या मराठी सिनेमातूनच. पण पिढ्‍यान्‌पिढ्‍या हा वारसा जपलेली ही काही मंडळी अजुनही आहेत.
आमच्‍या इथल्‍या cosmo काँलोनीत सध्‍या हे कुतुहलाचा विषय बनलेले आहेत.

Monday, December 08, 2008

प्रातिनिधीक

दूरपर्यंत रस्‍ता जिथवर दिसतोय तिथवर गाड्‍याच गाड्‍या. एखादी गाडी मिलिमीटरभर हलेल इतकीही जागा नाही.
५ मिनिटं......१०मिनिटं.........१५ मिनिटं.........माहित नाही अशी किती मिनिटं मोजली.
अजुनही मी तिथेच आहे...अडकलेली. कधी सुटणार हा ट्राफीक जाम? कधी थांबणार मनाची ही घुसमट? हवाय
फक्‍तं एक मोकळा श्‍वास....छातीभरुन !!!

प्रार्थना

एक आदिमानव ते एक अतिप्रगत मानव असा माझा प्रवास बराच लांबवरचा झाला. एक बुद्‍धीमान प्राणी,
माणूस म्‍हणून मी इथवर येईन असा विचारही कधी केला नव्‍हता मी.
मी अतिप्रगत - पण बंदुकीच्‍या एका गोळीलाही माझं मला तोंड नाही देता येत. माझी शकलं-शकलं उडतात.
मी अतिप्रगत - पण मला माझ्‍या शत्रुचा चेहरा नाही ओळखता येत. पाठीमागून नाही तर समोरून वार करून
शत्रू मला चीत करतो.
मी अतिप्रगत - मी असा भावनाविवश की मी कोणाला मरतांना नाही पाहू शकत कारण मी कोणाला मारत नाही.
मी अतिप्रगत - स्‍वत:भोवती चार भिंतींचं जग उभारून मनाला खोटंच समाधान देत राहतो की मी इथे सुरक्षित
आहे. त्‍याबाहेर कोणालाही मदत करायची माझी तयारी नाही.
मी तत्‍वनिष्‍ठं. पण माझ्‍या तत्‍वांचं सामर्थ्‍य माझं मलाच ज्ञात नाही. शत्रू समोरुन माझ्‍या घरात शिरून माझ्‍या
स्‍वप्‍नांचा चक्‍काचूर करुन जातो. ना मी शस्‍त्र बाळगतो ना मी ते चालवायला शिकलोय.
स्‍वत:ची शिकार स्‍वत: करणं तर सोडाच, पण स्‍वत:चा बचावही मी स्‍वत: करु शकत नाही.


पण मनाच्‍या शक्‍तीवरचा माझा विश्‍वास अजून डळमळला नाहीए. प्रार्थनेचं सामर्थ्‍य मी जाणतो. मी प्रार्थना करु शकतो.
स्‍वत:च्‍या आणि इतर सर्व मित्रांच्‍या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी !!!

Saturday, March 15, 2008

11 months old he's now...amal

rang de basanti again...









Tuesday, November 06, 2007