आपल्या निरर्थक बडबडीलासुद्धा patiently कान देणारा
वेळप्रसंगी कान धरुन मार्गावर आणणारा
पलिकडच्या किनार्यावर आपली वाट पाहणारा
छोटासा दिवा बनून आपली सोबत करणारा
रक्ताची नाती काय क्षणात तुटतात
मनाची नाती हळूहळू जुळतात
एकदा जुळली की आयुष्यभर फुलतात
अशीही काही आपली माणसं असतात
कुणीच आपलं नसतं
मग आपण कोणासाठी असतो
वेड्या मनाचं समाधान
बाकि इथे प्रत्येकजण एकटाच असतो
पाखरं येतात दाणा टिपून उडून जातात
क्षणभराचं नातं जोडून आठवणी सोडून जातात
विस्मरणात गेल्या तर त्या आठवणी कसल्या
बिचार्या आपली संगत करत राहतात
इथून दूर जाताना
अनेक वाटा माझ्या असतील
पावलापावलवर
आठवणी मात्रं तुझ्या असतील...
- सोनल मोडक